आरीफ पटेल, मनोरमनोर बालविकास प्रकल्प अंतर्गत कुपोषित बालकांसाठी असलेल्या ग्राम बाल विकास केंद्राच्या अधिकाऱ्यांमध्येच समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी ‘ग्राम बाल विकास केंद्र’ सुरु करण्यासाठी दिलेले२० लाख रूपये गेले कुठे? त्याचे काय झाले? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. कुपोषणाने चार बालकांचा बळी गेला तरी प्रशासन ढीम्म आहे. अशीच परिस्थिती पालघर जिल्ह्यामध्ये आहे. नवा जिल्हा होऊन दोन वर्षे झालीत, परंतु रिक्त पदे भरण्याचा घोळ संपता संपत नाही तसेच शिक्षण, महिला बाल विकास, आरोग्य व महसूल या चारही विभागांनी एकत्रित काम केले तरच कुपोषण निर्मूलनाच्या कारवाईला गती येईल. मात्र त्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येते. कारण महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मते, गेल्यावर्षी कुपोषित मुलांसाठी ग्राम बाल विकास केंद्र सुरू केले होते. तसेच तालुका अधिकाऱ्यांकडूनही सांगितले जाते की, तालुक्यातही असे केंद्र सुरू केले होते. परंतु महिला बालविकास मनोर केंद्राचे प्रभारी अधिकारी पाटील व पालघर प्रकल्प अधिकारी एस. ए. हारे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, निधी अभावी गेल्यावर्षी ग्राम बाल विकास केंद्र सुरू केले नव्हते. आता सर्व सुरू आहेत, काही केंद्रे दोन चार दिवसात सुरू करण्यात येणार आहेत. पालघर जिल्हा महिला बालविकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र पाटील, यांना गेल्या वर्षीच्या ग्राम बाल विकास केंद्राबाबत विचारले असता त्यांनी त्यावर अंदाजे २० लाख खर्च झाला असे सांगितले. मात्र कें द्रच जर चालू केले नाही, तर हा २० लाखांचा खर्च गेला कुठे? असा प्रश्न निर्माण होतो. ते पुढे म्हणाले कि यावर्षी कुपोषित बालकांचे केंद्र सुरू करण्यासाठी १ कोटी २० लाख रूपये वितरीत केले आहे. ही रक्कम कधी कुणाला? कशासाठी दिली? त्याचा तपशील मात्र कुणाकडे नाही. त्यांनी गेल्या वर्षाची सॅम व मॅम बालकांची यादी देण्यासही टाळाटाळ केली.
मनोरमध्ये कुपोषण निर्मूलन कूर्मगतीने
By admin | Published: September 26, 2016 3:36 AM