ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - खंबाटा एव्हिएशनने कर्मचा-यांचे पगार थकवल्याप्रकरणी चर्चगेट येथील इरॉस इमारतीला टाळं ठोकण्यात आले आहे. ही इमारत खंबाटा कंपनीच्या मालकीची आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, यामुळे इरॉस सिनेमागृहातील सिनेमाचे खेळ बंद पडले आहेत.
नेमके काय आहे प्रकरण?
खंबाटा एव्हिएशनने गेल्या दहा महिन्यांपासून सुमारे २१०० कर्मचाऱ्यांचे पगार थकविले आहे. ३ वर्षांपासून कामगारांना बोनस देण्यात आला नाही. शिवाय, भविष्य निर्वाह निधीसह विविध भत्ते रखडविण्यात आले आहेत. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट झाली असताना व्यवस्थापनान मात्र याबाबत बेफिकीर आहे. खंबाटा कंपनीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.