शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्रेमी युगुलाचे घरातून पलायन

By admin | Published: August 06, 2016 1:30 AM

मुंबईच्या आकर्षणामुळे अनेक लहान मुले घरातून पळ काढत मुंबईत दाखल होतात.

मुंबई : मुंबईच्या आकर्षणामुळे अनेक लहान मुले घरातून पळ काढत मुंबईत दाखल होतात. अशी मुले रेल्वे स्थानकात सापडताच त्यांना पकडून पुन्हा पालकांच्या ताब्यात दिले जाते. अशाच एका घटनेत घरातून पळून आलेल्या १८ व १९ वयोगटातील प्रेमी युगुलाला दादर रेल्वे पोलिसांनी पकडून त्यांना पालकांच्या स्वाधीन केले. मुंबईच्या आकर्षणामुळे गाझियाबाद येथून त्यांनी पळ काढून मुंबई गाठली होती, अशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. ३ आॅगस्टच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे हे दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन व चारवर गस्त घालत होते. त्याचवेळी त्यांना १८ ते १९ वयोगटातील तरुण व तरुणी दिसून आले. त्यांच्याकडे बोबडे यांनी अधिक चौकशी केली असता समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे दोघेही घरातून पळून आले असावे, असा संशय बोबडे यांना आला. त्यांनी अधिक चौकशी केली असता आपले नाव अजीम नजीम (१९) आणि मुस्कान कदीम (१८) असून गाझियाबाद येथे राहणारे असल्याची माहिती दिली. अजीम हा इयत्ता बारावीत आणि मुस्कान ही अकरावीत शिकत आहे. ते दोघेही एकाच परिसरात राहणारे असून त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे. मुंबईचे आकर्षण व रोजगारासाठी त्यांनी मुंबई गाठली होती, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली. त्यांनी दोन्ही मुलांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.