ऑनलाइन लोकमत
मेडशी, दि. १४ - मालेगाव तालुक्यातील मेडशी ग्राम पंचायत उपसरपंच पदासाठी १४ जुलै रोजी निवडणूक असताना, विरोधी गटाचा उपसरपंच बनण्याची चिन्हे दिसताच पिठासीन अधिकारी असलेल्या सरपंच महिलेने नामनिर्देशन पत्राबबत अजब कारण पुढे करत सभागृहातून पळ काढला. त्या परत न आल्याने उपसरपंच पदाची निवडणूक होऊ शकली नाही.मेडशी ग्रामपंचायतवर मेडशीकर गटाची सत्ता असूने त्यांचे ८ सदस्य आहेत. सरपंच पदावर अनूसूचित जातीच्या सुनिता संतोष मेटांगे आहेत. गावविकासाच्या मुद्यावर पसरपंचासह तीन सदस्यांचे मतभेद झाले. उपसरपंचाने पदाचा राजीनामा दिल्याने १४ जुलै रोजी निवडणूक घेण्यात आली. दरम्यान मेडशीकर गटाच्या तीन सदस्यांनी बंड पुकारून शे. गणीभाई गटाशी हातमिळवणी केल्याने मेडशीकर गटाकडे पाच तर गणीभाई गटाकडे आठ सदस्य संख्या झाली. १४ जूलै रोजी सकाळी ११ वाजता गणिभाई गटाचे आठ सदस्य व मेडशीकर गटाचे पाच सदस्य निवडणुकीसाठी सभागृहात जमले. उपसरपंच पदासाठी गणीभाई गटाकडून मुलचंद चव्हाण तर मेडशीकर गटाच्यावतीने दत्तराव घुगे यांनी अर्ज दाखल केले. मेडशीकर गटाकडे केवळ पाच सदस्य संख्या असल्याने आणि गणिभार्ई गटाचा उपसरपंच होणार असल्याने दत्तराव घुगे यांनी निवडणुकीच्या दोन तास आधी उमेदवारी अर्ज दाखल करणे गरजेचे असल्याचे कारण पुढे करत मुलचंद चव्हाण यांचा अर्ज ११ वाजता भरला गेल्याने तो नामंजूर करावा अशी मागणी मेडशीकर गटाच्या सरपंच तथा निवडणुक अधिकारी संतोष मेटांगे यांनी ग्रामसेवकाकडे केली. ग्रामसेवकाने असा काही नियम नसल्याचे सांगून ग्रा.पं.अधिनियम समजून सांगण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मेडशीकर गटाच्या पाचही सदस्यांनी गोंधळ घालून निवडणूक प्रक्रिया थांबविली. ग्रामसेवकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुनही सभागृहात गोंधळ सुरु होता. या दरम्यान पिठासीन अधिकारी सुनिता मेटांगे या चार सदस्यासह सभागृहाबाहेर पडल्या. गणीभाई गटाचे आठही सदस्य सभागृहात हजर होते.निवडणूक प्रकरण वेगळे वळण घेत असल्याचे पाहून ग्रामसेवकाने हा प्रकार गटविकास अधिकारी संजय महागावकर यांच्या कानावर टाकला. महागावकर तातडीने दुपारी २ वाजताच्या सुमारास निवडणुकस्थळी दाखल झाले. निवडणूक अधिकाऱ्याला निर्णय न देता बाहेर पडता येत नसल्याने त्यांनी सरपंच मेटांगे यांना निर्णय देण्यासाठी सभागृहात येण्याची विनंती केली. मात्र, त्याऊपरही त्या आल्या नसल्याने निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांनी निवडणुक अधिकारी निर्णय न घेता निघून गेल्याने कार्यवाही करण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे सांगून या घटनेची नोंद प्रोसेडिंग बुकवर घेतली. दरम्यान, गटविकास अधिकारी महागावकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की मेडशीकर गटाच्या सदस्यांनी घेतलेले आक्षेप नियमबाह्य असून, सरपंच तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निर्णय न देताच सभागृहात बाहेर जाणे योग्य नाही. याबाबत निर्णय देण्याची विनंती केली असता गावपुढाऱ्याने महिलेला हाताशी धरुन गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे ही लोकशाहिची हत्या आहे, असे महागावकर म्हणाले.