सिंधुदुर्गनगरी - विद्यार्थ्यांची गुणवता उच्च क्षमतेने विकसित व्हावी, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी इंडियन कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च, सेंन्ट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन या संस्थाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इंटरनॅशनल बोर्डची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी येथे केली.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १६ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाच्या समारोपप्रसंगी तावडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार वैभव नाईक, शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष काळु बोरसे -पाटील आदी उपस्थित होते.तावडे म्हणाले, विद्यार्थ्यांची एकूणच गुणवत्ता वाढावी यासाठी इंटरनॅशनल बोर्डाची स्थापना करण्यात येणार आहे. माध्यमिक शालांत परिक्षेत सध्याचे विषय १0 ते १२ आहेत. या विषयांमध्ये वाढ करुन रोजगाराच्या संधी निर्माण होणाºया विषयांचा समावेश करावा किंवा कसे याबाबत विचारविनिमय सुरु आहे. विषय वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना आवडीचे शिक्षण मिळण्याबरोबरच रोजगार युक्त शिक्षण घेता येईल़शाळाबाह्य कामातून मुक्तता करणार - पंकजा मुंडेविद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित करण्यावर भर देण्याबरोबरच शिक्षकांना पूर्ण वेळ मिळावा म्हणून शाळाबाह्य कामातून शिक्षकांची मुक्तता करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.शिक्षकांबद्दल चांगले बोला; शिक्षकाची नारायण राणेंना विनंतीनारायण राणे यांनी या महाअधिवेशनात आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत भाषण केले. . वास्तववादी शिक्षणाचे चित्र समोर आणा, असे सांगत असतानाच एका शिक्षकाने शिक्षकांबद्धल चांगले बोला, असे राणेंना सांगितले.
महाराष्ट्र इंटरनॅशनल बोर्डची स्थापना करणार - विनोद तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 4:23 AM