शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

रेल्वेच्या सहकार्याने लासलगाव येथे कांद्यासाठी कोल्ड स्टोरेजची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 11:58 PM

राज्यातील शेतीमालाचे मुल्यवर्धन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना भारतीय रेल्वेचे सहकार्य लाभले असून लासलगाव

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21- राज्यातील शेतीमालाचे मुल्यवर्धन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना भारतीय रेल्वेचे सहकार्य लाभले असून लासलगाव (जि.नाशिक) येथे रेल्वे आणि खरेदी विक्री संघाच्या संयुक्त प्रयत्नातून ओनियन कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत 30 जुलैला त्याचे भूमिपूजन होत आहे.
 
राज्यातील अशा स्वरुपाचे हे पहिलेच कोल्ड स्टोरेज उभे राहणार आहे. लासलगाव ही देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असून या परिसरात विविध फळ पिकांचे उत्पादनही लक्षणीय प्रमाणात होत असते. येथील खरेदी विक्री संघ आणि रेल्वे मंत्रालयाचे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यात या स्टोरेजच्या उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात येत आहे. त्यानुसार लासलगाव खरेदी विक्री संघाकडून कंटेनर कॉर्पोरेशनला जवळपास सात एकर जागा देण्यात येत आहे. या जागेच्या काही भागावर कोल्ड स्टोरेज उभारण्यात येईल. याच जागेवर संघाची एकूण दोन हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमतेची  दोन वेअर हाऊस असून त्याचीही या प्रकल्पाला मदत होणार आहे. कंटेनर कॉर्पोरेशनकडून देशभरात कोल्ड स्टोरेजची साखळी स्थापित करण्यात येत असून त्याअंतर्गत हा उपक्रम आकारणार आहे. रेल्वेकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून (सीएसआर) पाच कोटींची मदत करण्यात आली असून गरज भासल्यास अधिकचा निधीही देण्याची तयारी रेल्वेने दर्शविली आहे.
 
या कोल्ड स्टोरेजची क्षमता दोन हजार मेट्रिक टनांहून अधिक असेल. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह इतर फळ बागायतदारांचीही मोठी सोय होणार आहे. तसेच या प्रकल्पाचा काही भाग विविध उपयोगांसाठी वापरण्यात येणार आहे. त्यात फळ पिकांवरील राईपनींग, प्रिकुलींग चेंबर आदी सुविधा उपलब्ध असतील. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्षे, डाळिंब, आंबा आदी फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूक व मुल्यवर्धन होणार आहे. वर्षभरापेक्षा कमी कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.
 
राज्यातील शेतकऱ्यांना अत्यंत सहाय्यभूत ठरणाऱ्या या प्रकल्प उभारणीसाठी रेल्वे मंत्रालयाने घेतलेला पुढाकार आणि आवश्यक ती मदत करण्याच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्र्यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानले आहेत.

(माझा वाढदिवस साजरा करू नका : मुख्यमंत्री)

(शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार कर्जमाफी -मुख्यमंत्री)

(मुख्यमंत्री, माझ्या मैत्रीचे राजकीय भांडवल नको - राधाकृष्ण विखे)