मुंबई : आॅनलाईन साईट्सवरुन औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांची खुलेआम विक्रीची प्रकरणे काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात समोर आली होती. याची दखल घेत केंद्राने आॅनलाईन औषध व सौंदर्यप्रसाधनसाधन विक्रीला आळा घालण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.ही समिती निकष निश्चित करणार असून त्यानंतर अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये दिल्ली, ओडिसा, कर्नाटक राज्याचे औषध नियंत्रक आणि ईश्वर रेड्डी, सह औषध नियंत्रक, भारत सरकार हे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या समितीने एका उपसमितीची स्थापना केली आहे. ही उपसमिती काऊंटरद्वारे होणारी विक्री, अनुसूची ‘एच’ औषधे, विविध प्रकारच्या सेवांचा उहापोह करणार आहे. (प्रतिनिधी)
आॅनलाईन फार्मसीसंदर्भात समितीची स्थापना
By admin | Published: July 29, 2015 2:11 AM