स्नेहा मोरे,
मुंबई- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने राज्यातील विविध संस्था, विद्यापीठांशी संलग्न होऊन ज्ञानमंडळांची स्थापना केली आहे. या ज्ञानमंडळांच्या माध्यमातून विश्वकोशाच्या २० खंडांमधील नोंदींचे अद्ययावतीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता विश्वकोश मंडळातर्फे ज्ञानमंडळांच्या कार्याकरिता स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येणार आहे.सध्या विश्वकोश मंडळाकडे ६० संकल्पित आणि २२ कार्यान्वित ज्ञानमंडळे आहेत. शिवाय, त्यात प्रस्तावित ६ आणि भविष्यातील ३२ ज्ञानमंडळांचा समावेश आहे. नुकतीच या ज्ञानमंडळांच्या समन्वयकांची बैठक पार पडली. त्यात नोंदीच्या अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.ज्ञानमंडळांच्या स्वतंत्र संकेतस्थळात १०० नोंदी, ५० लेखकांचा समावेश असेल. हे संकेतस्थळ सहजरीत्या सामान्यांना हाताळता येईल, तसेच सर्व सामान्यांनाही नोंदीविषयी अद्ययावतीकरण सुचविता येईल. या संकेतस्थळाच्या निर्मितीचे काम सुरू झाले असल्याची माहिती विश्वकोश मंडळाने दिली. या उपक्रमांतर्गत नोंदींचे अद्ययावतीकरण, विविध विषयांच्या नव्या माहितीची भर घालणे अशी कामे केली जाणार आहेत. यासाठी ज्ञानमंडळाची स्थापना करून प्रत्येक उपविषयासाठी स्वतंत्र ज्ञानमंडळ असेल. ज्ञानमंडळाच्या रचनेमध्ये पाच तज्ज्ञांचे सल्लागार मंडळ व एक समन्वयक यांचा समावेश असेल.तस्थळ>विश्वकोश मंडळ फेसबुक आणि टिष्ट्वटरवर दाखलमहाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे फेसबुक पेज सुरू झाले आहे. या पेजवर दररोज दिनविशेष, इतिहासातील महत्त्वाचे संदर्भ आणि ताज्या घडामोडींच्या संदर्भातील विश्वकोशातील माहिती अपडेट केली जाते. या पेजवर सर्व माहिती विश्वकोशाच्या नोंदीच्या लिंकसह अपलोड केली जात असल्याने, वापरणाऱ्यांना हाताळणे अत्यंत सोपे झाले आहे. शिवाय, टिष्ट्वटरवरही @टश््र२ँ६ं‘ङ्म२ या हँडलने विश्वकोश मंडळाच्या वतीने माहितीपूर्ण टिष्ट्वट्स केले जातात.