शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

विधानसभेत उमटणार ईटीसी केंद्राचे पडसाद

By admin | Published: February 27, 2017 1:36 AM

महापालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण-प्रशिक्षण केंद्राचा कारभार दिवसेंदिवस वादग्रस्त होऊ लागला आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण-प्रशिक्षण केंद्राचा कारभार दिवसेंदिवस वादग्रस्त होऊ लागला आहे. केंद्र संचालिका यांच्या निवडीपासून ते लाभार्थ्यांच्या संख्येपर्यंत अनेक गोष्टींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या केंद्राची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आदर्श प्रकल्पांमध्ये ईटीसी केंद्राचा समावेश होतो. २००७मध्ये सुरू झालेल्या या केंद्राचा नावलौकिक देशभर झाला आहे; पण सद्य:स्थितीमध्ये कामकाज वादग्रस्त ठरू लागले आहे. लाभार्थ्यांचा आकडा पाच हजारांपेक्षा जास्त असल्याचे भासविले जात आहे; पण प्रत्यक्षात येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. वाढलेला आकडा हा फिजीओथेरपीसारख्या सुविधा व अपंगांसाठीच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांचा आहे. पुढील वर्षासाठी तब्बल १६ कोटी ३५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. दिव्यांग मुलांच्या शिक्षण व प्रशिक्षणावर खर्च करण्यासाठी पालिका सभागृहाने नेहमीच सढळ हाताने मदत केली आहे. या वर्षीही कोणीच विरोध करणार नाही; पण यापुढे ईटीसी केंद्रावर होणाऱ्या खर्चाचे सोशल आॅडिट करण्यात यावे. होणाऱ्या खर्चापैकी प्रत्यक्ष लाभार्थींवर किती खर्च झाला व प्रशासकीय कामांवर किती खर्च झाला हे पाहणे गरजेचे आहे. १० वर्षांमध्ये किती अपंगांचे पुनर्वसन केले हे तपासण्याची वेळ आली आहे. २०१३पासून फर्निचर खरेदीवर १ कोटी १८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. या चार वर्षांमध्ये गणवेश व इतर साहित्य खरेदीवर ३६ लाख रुपये खर्च झाले असून, आस्थापनेवर १० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. हे आकडे व प्रत्यक्ष लाभार्थींवर झालेला खर्च या सर्वांचा मेळ साधण्याची मागणी होत आहे. भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी ईटीसी केंद्राच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. येथील विद्यार्थी संख्या, केंद्र संचालिकांची नियुक्ती, फर्निचर व इतर सर्वच कामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जवळपास वर्षभर पालिका आयुक्तांकडेही तक्रारी केल्यानंतरही काहीच उपयोग होत नसल्याने आता थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या विषयावर चर्चा घडविणार असल्याचा इशारा दिला आहे. आता ईटीसीचा वाद अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)>२०१२ - १३ ते २०१६ - १७ मध्ये झालेल्या खर्चाचा तपशील शीर्षक खर्च (लाख)सकस आहार१७.७७गणवेश व इतर साहित्य२०.२७साहित्य, संशोधन४८.०३परिवहन सेवा१८४.७६केंद्राची देखभाल१६.७९फर्निचर व साहित्य११८.४३स्थापत्य कामे४५१.३६आस्थापना खर्च१४३४.४४वीज बिल२६.८दिव्यांगांसाठी योजना२६५.२६सामाजिक पुनर्वसन२६.५५>आयुक्तांच्या भूमिकेवर शंका महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संजय पत्तीवार यांच्या पदाला मंजुरी नसल्याने त्यांची पुन्हा आरोग्य विभागात रवानगी केली. इतर विभागातील मंजूर नसलेल्या पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांनाही मूळ संवर्गात पाठविले होते. पण ईटीसीच्या संचालिका वर्षा भगत यांच्या पदाला शासनाची मान्यता नसतानाही त्यांना मूळ संवर्गात पाठविलेले नाही. >ईटीसी केंद्राच्या संचालिका यांनी नियुक्तीच्या वेळी सादर केलेल्या अनुभवाविषयी शंका आहे. ही नियुक्ती नियमबाह्य झाली आहे. याशिवाय केंद्राच्या कामकाजामध्ये अनेक त्रुटी असून, त्याची सखोल चौकशी करून दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाईची मागणी विधानसभेत करणार आहे. - मंदा म्हात्रे, आमदार, भाजपा