मुंबई : भारतात एक्स्चेंज ट्रेडेड फंड्सचा (ईटीएफ्स) मोठा विस्तार होत आहे. ५८८ शहरांतील गुंतवणूकदार आता या प्रकारच्या गुंतवणुकीकडे आकर्षित होत आहेत. २००७-२००८ मध्ये ४६४ शहरांतून ईटीएफ्समध्ये गुंतवणूक झाली होती आता ती ५८८ शहरांत विस्तारली आहे. विशेष म्हणजे, उत्तर-पूर्वेकडील राज्यांतूनही मार्च २०१७ पर्यंत यात गुंतवणूक झाली आहे, असे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने दिलेल्या ताज्या माहितीत म्हटले आहे. नव्याने सहभागी झालेल्या शहरांत ऐझवाल आणि मिझोराम आहे.या दोन ठिकाणांहून २०१६-२०१७ वर्षात ईटीएफमध्ये सर्वात जास्त (२६ कोटी रुपये) व्यापार झाला. ऐझवालच्या नंतर अरुणाचल प्रदेशातील पापुम पारे शहराने २.६६ कोटी रुपयांचा व्यापार केला. (वाणिज्य प्रतिनिधी)
ईटीएफ्सचा विस्तार देशातील ५८८ शहरांत
By admin | Published: April 04, 2017 4:45 AM