शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

मूल्यमापन चाचणी एप्रिलमध्ये

By admin | Published: March 02, 2016 3:39 AM

प्रगत शैैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीसाठीची दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी येत्या ५ व ६ एप्रिल रोजी होणार आहे.

पुणे : प्रगत शैैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीसाठीची दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी येत्या ५ व ६ एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील निवडक २००० शाळांमध्ये त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन केले जाणार आहे. दुसरी चाचणी पहिल्या चाचणीसारखी पुन्हा प्रश्नपत्रिकेद्वारेच घेतली जाणार आहे. त्यामुळे दुसरी चाचणी आॅनलाइन घेण्याचा शिक्षण विभागाचा मानस बारगळल्याचे दिसत आहे.शाळांमध्ये राज्य स्तरावरून विद्या परिषदेच्या माध्यमातूनच परीक्षा घेतली जाणार असली, तरी परीक्षेसाठी त्रयस्थ संस्थांनी उपस्थित राहून मूल्यमापन करायला हवे. मात्र, पहिल्या पायाभूत चाचणीचे वेळापत्रक कोलमडल्यानंतर दुसऱ्या संकलित मूल्यमापन चाचणीला उशीर झाला. मात्र, तोपर्यंत विद्या परिषदेकडे त्रयस्थ संस्थांचे अर्जच उपलब्ध न झाल्याने, त्या चाचणीच्या वेळेस या प्रकारे मूल्यमापन झाले नाही.यंदाही प्रश्नपत्रिकेद्वारेच परीक्षापहिली पायाभूत चाचणी राज्य स्तरावर घेण्यात आली होती. मात्र, प्रश्नपत्रिका वेळेवर न पोहोचल्याने चाचणीचा कालावधी वाढवावा लागला होता. हे लक्षात घेऊन आॅनलाइन पद्धतीने प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर टाकून किंवा प्रश्नपत्रिकांची सीडी उपलब्ध करून, पुढील चाचणी घेण्याचे विद्या परिषदेने ठरवले होते. मात्र, ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणींचा विचार करून प्रश्नपत्रिकेद्वारेच चाचणी घेण्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)