कमलेश वानखेडे ल्ल नागपूरकाँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी विविध प्रश्नांवर देशभर फिरत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांनाही सक्रिय करण्यासाठी नगरसवेक, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या कामांचे तिमाही आॅडिट केले जाणार आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या परफॉर्मन्सचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करण्याच्या सूचना प्रदेश काँग्रेसने सर्व शहर काँग्रेसला दिल्या आहेत. शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यात पक्ष मजबूत होण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा आहेत, यावर मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाने मोठी पदे दिलेल्यांना आता पक्षाला ताकद देण्याची अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली. प्रदेश काँग्रेसतर्फे एक आचारसंहिता तयार केली जात आहे. शहर पातळीवर काँग्रेसची कुठलीही बैठक असो, त्यात पक्षाचे किती नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते याची नोंद घेतली जाईल. पक्षातर्फे झालेल्या आंदोलनात कोण अनुपस्थित होते, पक्षाचा कार्यक्रम कुणी राबविला नाही, याचा अहवाल प्रत्येक महिन्याला शहर काँग्रेसतर्फे तयार केला जाईल. निवडणुकीत कोणी फुटीर भूमिका घेतली, विरोधात मतदान केले; सत्तधारी भाजपाला मदत होईल अशी भूमिका कोणी घेतली का, याची नोंदही अहवालात केली जाईल. प्रत्येक महिन्याचा अहवाल एकत्र करून तिमाही अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करण्याची जबाबदारी शहर काँग्रेसवर सोपविण्यात आली आहे.असे होणार आॅडिट...च्नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची पक्षाच्या बैठकांना उपस्थितीच्पक्षाच्या आंदोलनांमध्ये सहभागच्पक्षाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीच्प्रभाग व ब्लॉकमध्ये लोकहितासाठी केलेली आंदोलनेच्सत्ताधारी भाजपाविरोधात घेतलेली भूमिका नगरसेवकांवर विशेष लक्ष आगामी महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने नगरसेवकांच्या कार्यप्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगरसेवकांनी समस्यांविरोधात कोणती आंदोलने केली] त्यासाठी शहर काँग्रेस समितीकडे मदत मागितली का, शहर काँग्रेसच्या आंदोलनात नगरसवेक सहभागी झाला का, यावर त्याचे मूल्यमापन होणार आहे. त्यावरूनच उमेदवारी देण्याचा निर्णय होईल.काम न करणारे ‘ब्लॉक’शहर काँग्रेसमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ब्लॉक अध्यक्षांच्या कामकाजाचे परीक्षण होणार आहे. त्यांचा नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी कसा समन्वय आहे, त्यांना सोबत घेऊन आंदोलने केली का, ब्लॉक अंतर्गत पक्षाचे कार्यक्रम किती प्रभावीपणे राबविले याचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. संबंधित निकषांवर कमी पडणाऱ्या ब्लॉक अध्यक्षाला पदावरून दूर करून सक्रिय कार्यकर्त्याला संधी देण्याच्या सूचनाही प्रदेश काँग्रेसने केल्या आहेत.