मुंबईः गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची ओल्या दुष्काळानं अक्षरशः वाट लावली. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातचं पीक वाया गेलं आहे. एवढं सगळं होऊनही केंद्रानं राज्यातील शेतकऱ्यांना मदत करताना हात आखडता घेतला होता. तोच धागा पकडत संभाजीराजेंनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला. राज्यसभेमध्ये संभाजीराजेंनी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत दिली जात नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. ट्विट करत त्यांनी सांगितलं की, विमा कंपन्यांची लूट व शेतकऱ्यांची परवड याविषयी संसदेत आवाज उठवला. कोल्हापूर - सांगली महापुराच्या नुकसान भरपाईचा आणि परतीच्या पावसाने खरिपाच्या नुकसान भरपाईचा एक रुपयाही अजून राज्याकडे पोहोचला नाही याचा जाब विचारून सरकारने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सभागृहात सांगितले. तसेच त्यांनी पूर्ण भाषणाचा व्हिडीओसुद्धा प्रसिद्ध केला आहे.
ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून एक रुपयाचीही मदत नाही; संभाजीराजे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 10:13 AM