लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 06:25 PM2024-07-03T18:25:32+5:302024-07-03T18:26:02+5:30

Nana Patole News: लोकसभेची लढाई जिंकलेली असली तरी संघर्ष अजून संपलेला नसून विधानसभा निवडणुकीतही असेच काम करुन विजयी पताका फडकवा,असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले.

Even if the Lok Sabha elections are won, the battle is not over yet, a clear indication from Nana Patole  | लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 

लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 

मुंबई -  लोकसभेची लढाई जिंकलेली असली तरी संघर्ष अजून संपलेला नसून विधानसभा निवडणुकीतही असेच काम करुन विजयी पताका फडकवा,असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात मोठा विजय मिळवल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सेल व विभागाच्या वतीने प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सेल व विभागाकडून दादरच्या शिवाजी मंदिर येथे करण्यात आला, यावेळी नना पटोले बोलत होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला यात प्रदेश काँग्रेसच्या विविध सेल व विभागाचे कार्य महत्वाचे ठरले आहे. या सर्वांनी राज्यातील गावागावात जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवण्याचे काम केले. तसेच काँग्रेसच्या ५ न्याय २५ गॅरंटीचे न्यायपत्र घरोघरी पोहचवण्याचे काम केले आहे. लोकसभेची लढाई जिंकलेली असली तरी संघर्ष अजून संपलेला नसून विधानसभा निवडणुकीतही असेच काम करुन विजयी पताका फडकवा,असे आवाहन पटोले यांनी केले.

भारतीय जनता पक्षाचे सरकार जनतेत नेहमीच फेक नरेटिव्ह पसरवत असते. महिलांना आरक्षण देण्याचे विधेयक मोठा गाजावाजा करून मंजूर केले, पण त्याची अमंलबजावणी ते करू शकत नाहीत. कारण जनगणनाच केलेली नाही. मोफत धान्य देण्याच्या नावाखाली प्लास्टिकचा तांदूळ देऊन गोरगरिब जनतेच्या जीवाशी ते खेळत आहेत. कोरोनाकाळात लस दिली व त्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो छापण्यात आला. आता त्या लसीमुळेच लोकांचे मृत्यू होत असल्याचे उघड झाले की भाजपा सरकारने जबाबदारी झटकली. भाजपाचे सरकार फक्त दिखाव्याचे काम करते. जबाबदारी काहीच घेत नाही. राज्यात १ लाख लोकांना नोकऱ्या दिल्या असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हा सुद्धा फेक नेरिटिव्ह पसरवण्याचाच प्रकार आहे असे म्हणत अच्छे दिनचे आश्वासन देऊन भाजपाचे फसवणूक केली पण सत्तेत आलो तर सच्चे दिन नक्कीच आणू, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.   

Web Title: Even if the Lok Sabha elections are won, the battle is not over yet, a clear indication from Nana Patole 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.