पैसा खर्च झाला तरी चालेल, जातनिहाय जनगणना होऊन जाऊ द्या; अजित पवारांची रोखठोक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 03:33 PM2023-10-23T15:33:05+5:302023-10-23T15:33:30+5:30
62 टक्के आरक्षण ओलांडली आहे. तरीही त्यात राहून मराठा समाजाला आरक्षण कसे देतां येईल याबाबत मार्ग काढतोय. उद्या आरक्षण टिकले नाही तर हेच लोक बोलतील, असेही पवार म्हणाले.
अजित पवार यांनी आज माढ्यामध्ये जातिय जनगणनेला उघड पाठिंबा दिला आहे. कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल, राज्यात एकदा जातनिहाय जनगणना व्हायला हवी असे अजित पवारांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणावरही अजित पवारांनी परखड मत व्यक्त करताना वाढत्या लोकसंख्येवरही आळा घालण्यास लोकांना सांगितले आहे.
2021 ला जनगणना व्हायला हवी होती पण ती झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी बिहारमध्ये जातीय जनगणना कशी करणअयात आली याची माहिती मागविली आहे. पैसा खर्च झाला तरी चालेल पण जनगणना गरजेची आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
62 टक्के आरक्षण ओलांडली आहे. तरीही त्यात राहून मराठा समाजाला आरक्षण कसे देतां येईल याबाबत मार्ग काढतोय. उद्या आरक्षण टिकले नाही तर हेच लोक बोलतील, असेही पवार म्हणाले. विलासराव देशमुख असताना आरक्षणाच्या मागणीने डोके वर काढले होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आरक्षण द्यायचा निर्णय झाला. आम्हाला जो सल्ला देण्यात आला त्या पद्धतीने आम्ही आरक्षण दिलेही. पण ते कोर्टात टिकले नाही. नंतर फडणवीस यांचे सरकार आले. त्यांनी दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले, पण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, असे अजित पवार म्हणाले.
आरक्षणाच्या मुद्द्याला अजित पवारांनी वाढत्या लोकसंख्येशी जोडले आहे. जसजशा पिढ्या वाढत जातात तसे शेतीचे तुकडे पडत जातात. त्यामुळे शेतकरी अल्पभूधारक होतो. कोणी थांबायलाच तयार नाहीय. स्वातंत्र्यावेळी आपण ३५ कोटी होतो, आता १४० कोटी झालोय. चौपटीने लोकसंख्या वाढलीय. आता आपण एक दोन अपत्यांवरच थांबायला हवेय. देवाची कृपा.. देवाची कृपा… काही देवाची कृपा नसते. आपलीच कृपा असते, कोणत्याही जाती धर्म, पंथात काही सांगितलेलं नाही. यामुळे सर्व समाजांनी दोन मुलांवर थांबायला हवेय, असे मत अजित पवार यांनी मांडले.