स्थनिक निवडणुकीतही महाविकास आघाडीने एकत्र लढावे; शरद पवारांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 10:45 AM2019-12-18T10:45:24+5:302019-12-18T10:45:38+5:30
पवारांनी आमदारांना मतदार संघातील विकास कामांवर लक्ष देण्याच्या सूचना केल्या. सर्वसामान्यांना भाजप नकोय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने चालविण्यावर भर द्यावा, असे निर्देशही पवारांनी दिले.
मुंबई - देशात आता भाजपविरोधी वातावरण तयार झाले आहे. भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र लढावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिला आहे.
राज्यातून भाजपला दूर करण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली आहे. आता भाजपचे वाढते वर्चस्व कमी करण्यासाठी पुढील काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढाव्या अशा सूचना पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे समजते. ते नागपूरमध्ये बोलत होते.
यावेळी पवारांनी आमदारांना मतदार संघातील विकास कामांवर लक्ष देण्याच्या सूचना केल्या. सर्वसामान्यांना भाजप नकोय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने चालविण्यावर भर द्यावा, असे निर्देशही पवारांनी दिले.