शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो, मला ५६ वर्षांत एकदाही दिली नाही; शरद पवारांचे बारामतीत आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 01:22 PM2024-04-08T13:22:48+5:302024-04-08T13:23:16+5:30

Sharad Pawar in Baramati: सत्ता ही अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. जर सत्ता एक व्यक्तीच्या हातात गेलीत भ्रष्टाचार फोफावतो. - शरद पवार

Even the farmer gives his bull a holiday, I have not once in 56 years; Sharad Pawar's challenge to Ajit pawar in Baramati | शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो, मला ५६ वर्षांत एकदाही दिली नाही; शरद पवारांचे बारामतीत आव्हान

शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो, मला ५६ वर्षांत एकदाही दिली नाही; शरद पवारांचे बारामतीत आव्हान

राज्यात सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे. याबाबत पाणी साठवण्याबाबत काही निर्णय घेतले. त्यावेळी दुष्काळ पडल्यावर गावागावात भाकरी दिली जायची. गावोगावी रोजगार हमी आणि बंधारे बांधण्यास सुरुवात केली. त्याकाळी भैरवनाथ शिक्षण संस्था काढण्यात आली. मात्र या संस्थेला अध्यक्ष म्हणून माझे नाव असल्याचे मला आज समजले, असे शरद  पवार बारामतीमध्ये प्रचार सभेत म्हणाले. 

मला सगळ्यात जास्त आनंद होतो. ज्यावेळी मी शेवटच्या दहा वर्षात देशाचा कृषिमंत्री होतो. तेव्हा माझ्यासमोर पेच निर्माण झाला होता. त्यावेळी देशात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र जो देश कृषिप्रधान देश आहे त्या देशात अन्न धान्याची आयात करणे मला पटले नाही. माझ्या काळात मी 71 हजार कोटींची कर्ज माफी केली. व्याज दरात शेतकऱ्यांना सुट दिली. कोणी न स्वीकारलेलं कृषी खात मी स्वीकारले. शेतीत अनेक बदल केल्याने आज  जगात 18 देशांना आपण धान्य निर्यात करतो. शेतकऱ्यामुळे ही बाब घडून आली, असे पवार म्हणाले. 

सत्ता ही अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. जर सत्ता एक व्यक्तीच्या हातात गेलीत भ्रष्टाचार फोफावतो. काहीजण म्हणतात बारामतीची निवडणूक ही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला हे मी सांगण्याची गरज नाही. सगळ्यांना मी मंत्रीपदे दिली. माझा स्वभाव वेगळा असल्याने मी कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घातले नाही. काहींनी टोकाची भूमिका घेतली आणि भाजप सोबत गेले. अनेक लोकांना संधी द्यायची होती. हा माझा हेतू होता, असे पवार म्हणाले. 

याचबरोबर एमआयडीसीमध्ये हजारो कामगार काम करीत आहेत. जनाई शिरसाईमध्ये काही अडचणी असतील तर त्यात आता मी लक्ष घालणार आहे. बघतो काम कसे होत नाही तेच असे आव्हान देत पवारांनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केली. ज्यांच्या हातात मी ह्या गोष्टी सोपविल्या होत्या त्यांनी ही कामे केली नाहीत. त्यामुळे माझ्या लोकांसाठी मी आता या गोष्टीत लक्ष घालणार आहे. सुप्रिया सुळेंची कामगिरी संसद सांगते. मी सांगत नाही. तिच्या अंगावर कधीही भ्रष्टाचाराचा आरोप झालेले नाहीत. सध्या आपली खून बदलली आहे. तुतारी ही आपली खून आहे. जिरायती भागाने कधीही आमची साथ सोडली नाहीत असे म्हणत पवारांनी बारामती भागाच्या विकासावर भाष्य केले. 

याचबरोबर अजित पवारांना आव्हान देताना माझे वय काढू नका? तुम्ही काय बघितले आहे माझे? हा गडी थांबणारा नाही. तुम्ही लोकांनी मला आमदार केले, मंत्री केले, चारवेळा मुख्यमंत्री केले. मात्र तुम्ही लोकांनी मला 56 वर्ष एकही सुट्टी दिली नाही. शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो मात्र आपण मला सुट्टी देत नाहीत. मी देखील पुढील काळात काम करत राहणार असल्याचे आश्वासन पवारांनी दिले. 

Web Title: Even the farmer gives his bull a holiday, I have not once in 56 years; Sharad Pawar's challenge to Ajit pawar in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.