शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

भलतेच औषध देणाऱ्या दुकानावर ‘एफडीए’चा बडगा

By admin | Published: October 06, 2014 4:37 AM

डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाऐवजी अधिक नफ्याच्या हव्यासातून भलतेच औषध दिले जात असल्याचे यवतमाळात उघडकीस आले आहे

सुरेंद्र राऊत, यवतमाळडॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाऐवजी अधिक नफ्याच्या हव्यासातून भलतेच औषध दिले जात असल्याचे यवतमाळात उघडकीस आले आहे. संबंधित दुकानदाराविरुद्ध एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) कारवाईचा बडगा उगारला आहे. मेडिकल स्टोअर्सच्या संचालकाविरुद्ध न्यायालयात थेट खटलाच दाखल केला आहे.येथील जिजाऊ हेल्थ केअरच्या संचालकाकडून एका रुग्णाला २०११मध्ये भलतेच औषध देण्यात आले होते. सतीश पंजाबराव ठाकरे यांना अ‍ॅमिकॅसिन इंजेक्शनऐवजी अ‍ॅक्रीस हे इंजेक्शन देण्यात आले. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाऐवजी भलतेच औषध दिल्याने ठाकरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर एफडीएने मेडिकल स्टोअर्सचा परवाना कायमचा रद्द केला होता. मात्र संबंधित चालकाने त्यास अपील करून ६० दिवसांसाठी परवाना निलंबित करण्याचा आदेश मिळविला होता. मात्र या मेडिकल स्टोअर्स चालकाच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. २९ आॅगस्टला हेल्थ केअरच्या चालकाने प्रवीण खडतकर यांना डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाऐवजी डॉक्टरांच्या परवानगीविना पुन्हा भलतेच औषध दिले. या प्रकरणी खडतकर यांनी एफडीएकडे तक्रार केली. त्याची दखल घेत मेडिकल स्टोअर्स चालकाविरुद्ध सहायक आयुक्तांच्या निर्देशावरून एफडीएचे निरीक्षक प्रवीण राऊत यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे.हॉस्पिटलच्या आवारात मेडिकल स्टोअरला जागा देताना मोठे डिपॉझिट घेतले जाते. शिवाय औषधांच्या विक्रीवर हॉस्पिटलला कमिशन द्यावे लागते. त्यातूनच कमी दर्जाची व भलतीच औषधे देण्याचे प्रकार घडतात. ही बाब तपासणीत निष्पन्न झाली, असे एफडीएचे सहायक आयुक्त अमृत निखाडे यांनी सांगितले. असे प्रकार पुन्हा आढळल्यास थेट न्यायालयीन कारवाईला संबंधितांना सामोरे जावे लागेल, असेही निखाडे यांनी सांगितले.