शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शिंदे गटाचे जिथे खासदार, तिथेही भाजपने सुरू केली तयारी जोरदार

By यदू जोशी | Published: May 28, 2023 6:46 AM

‘महाविजय २०२४’ : बूथपर्यंत बांधणीची व्यूहरचना, वॉररूमही स्थापणार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक १३ शिवसेना खासदारांच्या मतदारसंघांमध्येही भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. बूथरचनेपासून वॉररूम उभी करण्यापर्यंत सर्व यंत्रणा इथे उभी केली जात आहे. भाजपने चालविलेल्या या जोरदार तयारीच्या पार्श्वभूमीवरच  सावध झालेल्या शिंदे गटाकडून २२ जागा लढण्याचा मानस बोलून दाखविला गेला, असे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या गटातील खासदारांची तीन दिवसांपूर्वी बैठक घेतली व त्यानंतर  लोकसभेच्या २२ जागा युतीमध्ये मागण्याची भाषा सुरू झाली. मात्र, त्याचवेळी भाजपने शिंदेंच्या १३ खासदारांच्या मतदारसंघांमध्ये समांतर प्रचार यंत्रणा राबविण्याचे काम हाती घेतले आहे. 

अशी करत आहेत तयारी...शक्तीकेंद्र प्रमुखांपासून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी संघटनात्मक ढाचा तयार केला जात आहे. कोणते मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे जातील याचा विचार न करता प्रत्येक ठिकाणी सारखीच जय्यत तयारी करा. जागावाटपात पुढे काय होईल हा तुमचा विषय नाही. आपल्या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे म्हणून आपल्याला काही करण्याची गरज नाही असे अजिबात समजू नका, असे निर्देश खालपर्यंतच्या यंत्रणेला देण्यात आले आहेत. 

शिंदे समर्थक खासदारांची चिंताभाजपइतकी संघटनात्मक रचना शिंदे गटाकडे नाही. त्यामुळे त्यांना भाजपवरच अवलंबून राहावे लागेल. भाजपची तयारी आपल्याला पूरकच असल्याचे शिंदे गटाला वाटत होते. पण तयारी करता करता भाजप जागेवर दावा तर सांगणार नाही ना, अशी शंका शिंदे समर्थकांना सतावत आहे. 

लहान-मोठ्या नेत्यांचे ‘इनकमिंग’शिंदे व ठाकरे गटाचे खासदार असलेल्या मतदारसंघांमधील विविध पक्षांच्या लहान-मोठ्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्याची मोहीम हाती घेतली आहे. माजी मंत्री अनंतराव देशमुख यांना अलीकडे भाजपमध्ये आणले गेले. शिंदे गटाच्या खा. भावना गवळी यांच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील ते प्रभावी नेते आहेत.

मतभेद नको, कामाला लागाभाजपकडे असलेले मतदारसंघ किंवा शिंदेंच्या खासदारांकडे असलेले, असा कोणताही भेद न करता जोरदार तयारीला लागा, असे आदेश ‘महाविजय २०२४’ हे मिशन राबवित असलेल्या पक्षाच्या समितीलाच नव्हेतर, खालपर्यंतच्या यंत्रणेलादेखील देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आ. श्रीकांत भारतीय यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाने नेमलेल्या ‘महाविजय २०२४’ अभियानाचे मुख्य मार्गदर्शक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आहेत. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना