पुणो : शहराला पाणीपुरवठा करणारी धरणो मागील वर्षी पूर्णक्षमतेने भरलेली असली, तरी अद्यापही महापालिकेकडे पिण्याच्या पाण्यासाठी रोज तब्बल 5क्क् टँकरची मागणी आहे. त्यात खासगी टँकरचाही समावेश आहे. विशेषत: उपनगरांमध्ये हा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
महापालिकेकडून शहरात गेल्या वर्षभरापासून दोनवेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरव़ठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने अध्र्याहून अधिक शहरात दोन वेळ पाणी दिले जाते. तर, महापालिकेची वितरण व्यवस्था सक्षम नसल्याने तसेच भौगोलिक स्थितीमुळे काही उपनगरांमध्ये एकवेळच पाणी देण्यात येत आहे. मात्र, यंत्रणोतील दोषांमुळे शहरात अनेक ठिकाणी अद्यापही नागारिकांना पाणी मिळत नसल्याने दररोज तब्बल पाचशे टँकरची मागणी रोज पालिकेकडे केली जात असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)
मार्च ते मे 2क्14 या तीन महिन्यात शहरात पालिकेच्या सात टँकर भरणा केंद्रावरून तब्बल 45 हजार टँकरच्या फे-या झाल्या असून जून महिन्याच्या पहिल्या चार दिवसातही सुमारे 3 हजार टँकरच्या फे-या झालेल्या आहेत. ही मागणी नियमितपणो वाढतच असून शहराच्या हददीजवळ मोठमोठया सोसयटया झाल्या असून त्या ठिकाणी पाणीपुरवठा करणो प्रशासनास शक्य नाही.