शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

रोज एका पालकाला शाळेत पाहुणचार!

By admin | Published: November 24, 2015 2:54 AM

शालेय पोषण आहाराचा शिक्षक कितीही त्रागा करीत असले, तरी शाळेच्या मुदपाकखान्यातून त्यांची सुटका होण्याची सध्या तरी चिन्हे नाहीत.

अविनाश साबापुरे, यवतमाळशालेय पोषण आहाराचा शिक्षक कितीही त्रागा करीत असले, तरी शाळेच्या मुदपाकखान्यातून त्यांची सुटका होण्याची सध्या तरी चिन्हे नाहीत. आहाराचा दर्जा तपासण्यासाठी आता अजब निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. तो म्हणजे, दररोज एका पालकाला शाळेत पाहुणचार देण्याचा! येत्या १ डिसेंबरपासून या ‘पाहुणचारा’ची सुरुवात करण्याचे आदेश आहेत.या निर्णयानुसार, शालेय पोषण आहार वाटपावेळी प्रत्येक शाळेमध्ये दररोज एक पालक उपस्थित राहून जेवण घेणार आहे. नुसता जेवणच घेणार नाही, तर जेवण कसे होते? धान्याचा दर्जा कसा होता? अन्न चविष्ट होते का? शासनाच्या निकषांनुसार विद्यार्थ्यांना आहार दिला गेला का? याचीही तो पडताळणी करेल. जेवण झाल्या-झाल्या तो पोषण आहाराच्या दर्जाविषयी लगेच गटशिक्षणाधिकाऱ्यांना एसएमएस पाठवेल. अशा सर्व शाळांतून दररोज येणाऱ्या एसएमएसचा गटशिक्षणाधिकारी संग्रह करतील.पंचायत समित्या सर्व एसएमएसचा एकत्रित साप्ताहिक अहवाल तयार करतील. ज्या शाळेतील पोषण आहाराबाबत तक्रार असेल, अशा शाळांचा अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवतील. त्यानुसार संबधित शाळेतील मालाची देयके अदा करण्यात येऊ नयेत, अशा सूचना शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.पोषण आहाराचा तांदूळ कमी आढळल्याने अमरावती जिल्ह्याच्या सेमाडोह येथील शिक्षकाने नुकतीच कारवाईच्या भीतीने आत्महत्या केली. या घटनेने राज्यभरातील शिक्षकांमध्ये संताप पसरलेला असताना पोषण आहाराच्या दर्जावर पालकांकडून ‘वॉच’ ठेवण्याचा आदेश काढून, संचालनालयाने शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशा शब्दांत शिक्षकांनी भावना व्यक्त केल्या आहेत.शाळास्तरावर निधीतालुक्यात जेथे शाळा व्यवस्थापन समिती कार्यरत असेल, त्या शाळेला धान्यादी मालाचा निधी शाळास्तरावरच वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यात किमान एका शाळेत हा प्रकार प्रायोगिक तत्त्वावर करावयाचा आहे. सहा महिन्यांनंतर या संदर्भात शिक्षण संचालनालयाकडून आढावा घेण्यात येणार आहे