पुणे : महाराष्ट्र व पंजाबचा भाषिक दुवा साधणाऱ्या घुमान संमेलनाच्या यशस्वी आयोजनानंतर सरहद संस्थेने ‘मराठी भाषेचा भारतीय भाषांसाठी पुढाकार’ या विचारातून आता दरवर्षी घुमानला साहित्य संमेलन आयोजित करण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे, ज्या तारखांना मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्याच तारखांना म्हणजे दि. ३ व ४ एप्रिल रोजी घुमान येथे हे आठ भाषांचे संमेलन रंगणार आहे. ‘मराठी भाषेचा भारतीय भाषांसाठी पुढाकार’ या संकल्पनेअंतर्गत प्रामुख्याने देशाच्या सीमावर्ती भागातील व सरहद संस्थेचे काम असणाऱ्या भागातील भाषांचे संमेलन भरविण्यात येणार आहे. मराठीसह हिंदी, उर्दू, पंजाबी, काश्मिरी, आसामी, बंगाली व बोडो या भाषांचा यामध्ये समावेश असेल. (प्रतिनिधी)
घुमानला दरवर्षी ‘भाषिक संमेलन’
By admin | Published: February 24, 2016 12:57 AM