शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

सर्वकाही शिवसैनिकांच्या भरवशावर

By admin | Published: February 13, 2017 12:45 AM

जिल्हा परिषदांच्या राजकारणाकडे शिवसेनेने गांभीर्याने कधी न पाहिल्याने कायमच चौथे स्थान राहिले आहे. हिंगोली या एकमेव जिल्हा परिषदेत बहुमत आणि रत्नागिरी

जिल्हा परिषदांच्या राजकारणाकडे शिवसेनेने गांभीर्याने कधी न पाहिल्याने कायमच चौथे स्थान राहिले आहे. हिंगोली या एकमेव जिल्हा परिषदेत बहुमत आणि रत्नागिरी, औरंगाबाद या जिल्हा परिषदांमध्ये सर्वांत मोठा पक्ष असे मर्यादितच यश मागील निवडणुकीत शिवसेनेची कामगिरी राहिली आहे. परिणामी, कॉँग्रेसच्या नेत्यांच्या, तसेच कार्यकर्त्यांच्या मुलांनी ग्रामीण भागात शिवसेनेचा विस्तार करण्यात आघाडी घेतली, असे मानले जात असले, तरी तिला मर्यादितच यश मिळाले आहे. हीच परंपरा चालू निवडणुकीतही कायम राहील, असे दिसते. मुंबईसह कोकणपट्ट्याच्या खालोखाल शिवसेनेचा मराठवाड्यात दबदबा आहे. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जेमतेम ताकद असल्याने जिल्हा परिषदांच्या निवडणुका नेहमीच स्वतंत्रपणे लढविताना शिवसेनेला मर्यादित यश मिळत राहिले आहे. गत निवडणुकीत पंचवीसपैकी हिंगोली या एकमेव जिल्हा परिषदेत बहुमत मिळाले होते. तेथे पन्नासपैकी सत्तावीस जागा सेनेने जिंकल्या होत्या, तसा तो चमत्कारच होता. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचा दबदबा आहे, पण पंचवीस जागा जिंकून तेथे सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून यश मिळविले असले, तरी बहुमतासाठी चार जागा कमी पडल्या, तेव्हा सात जागा जिंकणाऱ्या भाजपाची मदत घेण्यात आली होती. औरंगाबाद ही तिसरी जिल्हा परिषद होती की, जेथे साठपैकी सर्वाधिक सतरा जागा जिंकून शिवसेना सर्वांत मोठा पक्ष म्हणून सत्तेवर आला होता. पंचवीसपैकी सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेला भोपळा फोडता आला नव्हता. सिंधुदुर्ग (४), नगर (६), कोल्हापूर (६), बीड (२), नांदेड (९), लातूर (५), अमरावती (७), वर्धा (१), चंद्रपूर (२), आणि गडचिरोली (२) असे दहा जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेचे एक आकडी यश होते. नाशिकमध्ये १७, पुणे १२, जालना १५ आणि परभणीत ११ जागा जिंकून दुसरे स्थान पटकाविले होते. उर्वरित पाच जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना तिसऱ्या स्थानावर होती. त्यामध्ये रायगड १४, जळगाव १५, उस्मानाबाद १३, बुलडाणा ११ आणि यवतमाळ १२ यांचा समावेश होता. एक आकडी दहा आणि शून्यावर तीन ठिकाणी बाद होणे म्हणजे निम्म्या जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व नगण्यच आहे. लोकसभा निवडणूक भाजपाशी युती करून शिवसेनेने पुन्हा घवघवीत यश मिळविले, पण विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती तोडून शिवसेनेची फटफजिती केली. या दोन्ही पक्षांतील एक नंबरचे स्थानही शिवसेनेने गमाविले. या पार्श्वभूमीवर मुंबर्ई महापालिकेच्या राजकारणावरून दोन्ही पक्षांत घमासान चालू आहे. तरीदेखील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीकडे कोणाचे लक्ष नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसच्या या संस्थांमधील वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी भाजपाने जवळपास सहा महिन्यांपासून केली आहे. त्या तुलनेने शिवसेनेने याकडे अजिबात लक्ष दिलेले नाही. कोकणात रत्नागिरीसारख्या बाल्लेकिल्ल्यातसुद्धा नेत्यांची भांडणे सुरू आहेत. परिणामी, बंडखोरीचे लोण वाढले आहे. सत्तेची दावेदार असलेली शिवसेना मात्र मागे पडणार असे दिसते. राष्ट्रवादीची तख्ते आणि भाजपाची मर्यादित ताकद हीच रत्नागिरीत शिवसेनेची जमेची बाजू म्हणता येईल. मुंबई, ठाणे आणि नाशिकची लढत प्रतिष्ठेची करीत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याच्यापलीकडे एकही सभा ग्रामीण भागात दिलेली नसल्याने जिल्हा परिषदांचे राजकारण त्यांना दुय्यमच वाटते, हे स्पष्ट आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत शिवसेनेचे चौथे स्थान कोणी हिरावून घेईल, असे वाटत नाही.विदर्भापेक्षा मराठवाड्यात संधीमराठवाड्यात तुलनेने भाजपापेक्षा शिवसेना अधिक चांगली लढत देऊ शकतो. कॉँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्ध भाजप या लढाईत शिवसेनेला संधी आहे, पण वरिष्ठ नेत्यांकडून शिवसैनिकांना बळच मिळत नाही. नाशिक, नगर, जळगावमध्येही हीच अवस्था आहे. विदर्भात मात्र, शिवसेनेची ताकद कमीच होण्याची शक्यता आहे. -वसंत भोसले