शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

माजी सभापतीची पत्नीला जबर मारहाण

By admin | Published: April 04, 2017 1:26 AM

‘भाजी गार का वाढली?’ या कारणावरून पत्नीला पाय धुऊन पाणी पिण्यास भाग पाडून जबर मारहाण करण्यात आली.

नारायणगाव : ‘भाजी गार का वाढली?’ या कारणावरून पत्नीला पाय धुऊन पाणी पिण्यास भाग पाडून जबर मारहाण करण्यात आली. जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती देवेंद्र भिकाजी खंडे यांच्यावर पत्नीला जबर मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.देवेंद्र भिकाजी खंडे (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रूपाली खंडे (वय ३४, रा. सम्राट अशोक नगर, नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे.सहायक पोलीस निरीक्षक मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडे हे काल (दि. २) दुपारी १२.३० वाजता दारू पिऊन घरी आले. त्यांना त्यांची पत्नी रूपाली यांनी जेवण वाढले असता ‘तू भाजी गार का वाढली’ असे म्हणत पत्नीला शिवीगाळ केली. पत्नीने भाजी गरम करून देते म्हणाल्याने खंडे यांनी चिडून जाऊन पत्नीला मारहाण केली व स्वत:चे पाय धुऊन पत्नीला ते पाणी पिण्यास लावले. चार ग्लास पाणी जबरदस्तीने पिण्यास भाग पाडून पत्नीला पुन्हा लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून तोंडावर जोराने बुक्क्या मारून जबड्यावरचे दोन दात पाडून अमानुषपणे मारहाण केली. खंडेवर अनेक बँकांचे कर्ज आहे. तसेच अनेकांकडून उसने पैसे घेतले आहेत. ते पैसे देणे शक्य नसल्याने त्यांना दारूचे व्यसन जडले होते. कर्जामुळे बाहेरचा तणाव घेऊन खंडे हे अनेक वर्षांपासून पत्नी व मुलांना मारहाण करीत असे. खंडे यांना दारूचे व्यसन जडल्यामुळे ते पत्नी आणि मुलांना वारंवार मारहाण करीत असत. त्यांच्या जाचाला कंटाळून काही दिवसांपूर्वी रुपाली खंडे या मुंबई येथे माहेरी गेल्या होत्या. परंतु, वडील व आई यांनी समजून सांगून त्यांना परत नारायणगाव येथे पाठवले होते. त्यानंतरही खंडे हा छोट्या-छोट्या कारणावरून शारीरिक व मारहाण त्रास देत आला होता. काल दारू पिऊन जबर मारहाण केल्याने खंडेच्या तावडीतून सुटून नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के. डी. ढमाले हे करीत आहेत. (वार्ताहर)