सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची जन्मशताब्दी सोमवारी सांगलीसह राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सकाळी सात वाजता दादांचे जन्मगाव पद्माळे (ता. मिरज) येथून वसंत ज्योत स्मारकस्थळी आणण्यात आली. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली.कृष्णाकाठावरील वसंतदादा स्मारकस्थळी दिवसभर गर्दी होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, आमदार सर्वश्री शिवाजीराव नाईक, सुमनताई पाटील, मोहनराव कदम, सुधीर गाडगीळ, दादांचे नातू व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, हाफिज धत्तुरे, प्रा. शरद पाटील, प्रकाश आवाडे, दिनकर पाटील, प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, महापौर हारुण शिकलगार आदी मान्यवरांनी स्मारकस्थळी दादांना आदरांजली वाहिली आणि आठवणींना उजाळा दिला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना मान्यवरांची आदरांजली, जन्मशताब्दी विविध उपक्रमांनी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 3:39 AM