ऑनलाइन लोकमत
जळगाव,दि. 24 - चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या देवेंद्र इमारतीत अनधिकृत प्रवेश करत संस्थेच्या रेकॉर्ड व कपाटांची तोडफोड केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील खटल्यातील संशयीत आरोपी माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना २४ रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या देवेंद्र इमारतीत संस्थेचे रेकॉर्डसह कपाटाची तोडफोड केल्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह १८ जणांविरूद्ध नितीन गोविंदा भोळे यांच्या फिर्यादीनुसार २० एप्रिल २००८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यात १८ जून २०१६ रोजी आमदार खडसेंविरूद्ध जामीनपात्र वारंटचा हुकूम बजावण्यात आला होता,त्यानुसार ते खडसे आज भुसावळच्या अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्या़एम.एम़बवरे यांच्या न्यायासनासमा२े हजर झाले़ वारंट रद्द करण्यासह जामिनासाठी अर्ज करण्यात आला तो न्यायालयाने मंजूर केला़ १५ हजार रुपयांच्या जामीन मंजूर करण्यात आला़ खडसे यांच्यातर्फे अॅड़अजितकुमार गुप्ता यांनी काम पाहिले.