शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

परीक्षा प्रक्रियेतील चुका भोवणार!

By admin | Published: September 22, 2015 1:40 AM

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेत निष्काळजीपणा व चुका आढळून आल्यास दोषी प्राचार्य, प्राध्यापकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेत निष्काळजीपणा व चुका आढळून आल्यास दोषी प्राचार्य, प्राध्यापकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कुलगुरू मोहन खेडकर यांनी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. परीक्षा विभागाद्वारे तयार केलेल्या दंडात्मक कारवाईच्या या अहवालाला परीक्षा मंडळाने मान्यता दिली होती.विद्यापीठांतर्गत पाच जिल्ह्यांत ४१६ महाविद्यालये असून, दरवर्षी सुमारे ४ लाख विद्यार्थी विविध शाखांतर्गत परीक्षा देतात. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे सेट तयार करण्यापासून मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन व निकालाच्या प्रक्रियेपर्यंतची अनेक कामे विद्यापीठस्तरावर केली जातात. अनेकदा या कामांमध्ये निष्काळजीपणा व चुका आढळून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर मोठा प्रभाव पडतो. अशा चुका व निष्काळजीपणाबाबत आजवर विद्यापीठाकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार दंडात्मक कारवाईसह महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४चे कलम ३२नुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.