निमगाव केतकी : येथील चिंचवाडीनजीक असणाऱ्या पाणी साठवणीच्या तळ्यामधून बेसुमार मातीउपसा केला गेला आहे. हा उपसा सुरूच असून, या प्रकाराकडे प्रसासनाने डोळेझाक केली आहे. यामुळे शासनाचा हजारो रुपयांचा महसूल बुडत आहे.आकाराने भलेमोठे असणाऱ्या तळ्यामधून जेसिबी मशिन आणि ट्रॅक्टरच्या साह्याने तळ्यामध्ये असणारी गाळाची माती खोदून नेली आहे. काही लोकांनी ही माती उचलून नेऊन आपल्या असणाऱ्या खडकाळ जमिनीत टाकली, तर काहींनी शेततळ्याला वापरली. विशेष म्हणजे, ही माती भरून नेत असताना कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी घेतलेली नाही. या प्रकाराबाबत महसूल खाते मात्र अनभिज्ञ आहे. वास्तविक पाहता, या तळ्यामधून माती नेण्यासाठी महसूल विभागाच्या परवानगीची गरज होती. परंतु, महसूल विभागाला अंधारात ठेवून लोकांनी मोठ्या प्रमाणावर माती पळवली आहे. त्यामुळे महसूल विभागाचा आणि पयार्याने शासनाचा महसूल बुडाला आहे. (वार्ताहर)>या तळ्यात मोठमोठे असमान खड्डे पडलेले आहेत. या तळ्यामधील माती संपली, तरी पळावापळवी थांबली नाही. मातीच्या खाली निघणारा मुरूमसुद्धा काढून तो विकला जात आहे. या तलावातील मातीउपसा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. >बेकायदेशीर वाळूवाहतूक करणारे ट्रक सोनवडीतून पसारदौंड : सोनवडी परिसरात बेकायदेशीर वाळूवाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर कारवाई करीत असताना हे दोन्ही ट्रक भरधाव फरार झाल्यामुळे त्यांच्यावर वाळूचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात मंडलाधिकारी भानुदास येडे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सोनवडी येथील शासकीय गोदामातून धान्य तपासणी करून तहसीलदार विवेक साळुंके, धनाजी पाटील, दगडू यादव, सुनील जाधव, संजय माकर, दिनेश तावरे ही सर्व महसूल खात्याची मंडळी सोनवडीला येत असताना त्यांना या रोडवर ट्रक (एमएच १६ ए. ई ५७२५) आणि दुसरा ट्रक (एमए १६ ए. ई. ७00९) हे दोन्ही ट्रक वाळूने भरलेले उभे होते. महसूल खात्याच्या पथकाने ट्रकचालकांना वाळू परवान्याबाबत विचारले असता हे दोन्ही ट्रकचालक भरधाव वेगाने ट्रक घेऊन पळाले. महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांवर अरेरावी करुन शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)
बेसुमार मातीउपसा सुरूच
By admin | Published: March 04, 2017 1:06 AM