शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

परीक्षा अर्जात 'हिंदू' शब्द का नाही ? शिक्षण मंडळाने दिले 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 7:04 PM

परीक्षा अर्जामध्ये हिंदु शब्द वगळल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुणे : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा अर्जामध्ये २०१४ पासूनच मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी व जैन यासाठी ‘मायनॉरिटी रिलीजन’ व इतर सर्व घटकांसाठी ‘नॉन मायनॉरिटी’ असे रकाने समाविष्ट करण्यात आले आहेत, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहे. ही माहिती विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रावर नमुद करण्यात येत नसल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

 परीक्षा अर्जामध्ये हिंदु शब्द वगळल्याच्या बातम्या प्रसिध्द होत असल्याच्या पार्श्वभुमीवर मंडळाने हा खुलासा केला आहे. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जातील मायनॉरिटी रिलीजन या रकान्यात मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी व जैन या उपरकान्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त उर्वरित सर्व घटकांसाठी नॉन मायनॉरिटी हा रकाना २०१४ पासून समाविष्ट आहे. तेव्हापासूनच प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती मंडळाच्या परीक्षा अर्जामध्ये भरून घेण्यात येते. 

केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय व राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाने २०१३ मधये स्पर्धा परीक्षांसाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची माहिती मंडळाकडे मागितली होती. त्यानुसार मंडळाच्या परीक्षा समितीच्या ठरावाने परीक्षा अर्जामध्ये उपरकान्यांचा समावेश करण्यात आले. मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, पारसी व जैन हे अल्पसंख्यांक समुपदाय राज्य शासनाच्या अधिसुचनेनुसार अर्जामध्ये घेण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना माहिती भरण्यासाठी नॉन मायनॉरिटी हा रकाना उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे भोसले यांनी स्पष्ट केले आहे. ------------------------

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीexamपरीक्षाHinduहिंदू