पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि भाजपा आगामी काळात एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. बाळा नांदगावकर यांच्या राजकारणात कधीच कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो या विधानामुळेच भाजपा व मनसेच्या युती होणाच्या चर्चेला उधाण आले होते. भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणाच्या चर्चेवर माणसाने झेपेल ते करावं असं म्हणत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
अमित शाह प्रखर राष्ट्रभक्त, तर राहुल गांधी...; संजय राऊत 'रोखठोक' बोलले!
विधानसभा निवडणुकीनंतर सातत्यानं भाजपाला लक्ष्य करणारे आणि शिवसेनेची सत्ता आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांची आज लोकमत पत्रकार पुरस्कार सोहळ्यात मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत संजय राऊत यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीवर प्रश्न विचारण्यात आला. यावर युतीबाबत काय निर्णय घ्यायचा हा भाजपा आणि मनसेचा निर्णय आहे. भाजपाला राज ठाकरे यांना घेऊन राजकारण करायचं असेल तर करु शकतात असं संजय राऊत यांनी सांगितले. तसेच भाजपाने मनसेसोबत युती केली तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भाजपाला उत्तरं द्यावी लागतील. त्यामुळे माणसाने झेपेल ते करावं, आम्हाला जी गोष्ट झेपली ती आम्ही केली असल्याचे संजय राऊत यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.
मी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय, संजय राऊत यांनी उघड केले गुपित
राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्यामुळे भाजपा आणि मनसे आगामी काळात एकत्र येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मनसेचे बाळा नांदगावकर यांनी मनसे भाजपासोबत युती करणार नाही. मनसे येणाऱ्या निवडणुकीत स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजपासोबतच्या युतीवर मनसेचं पुन्हा मोठं विधान
दरम्यान, आगामी 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन असून या अधिवेशनात राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकत्व कायद्यावरुन राज्यात जे आंदोलन सुरु आहे, नवीन सरकारची कामगिरी या सर्व विषयावर राज ठाकरे बोलणार असल्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे. तसेच राज ठाकरेंनी आतापर्यत नरेंद्र मोदींच्या धोरणावर खूप आगपाखड केली आहे. त्यामुळे अधिवेशनात आता पुन्हा भाजपा आणि महाशिवआघाडीच्या सरकारवर निशाणा साधणार हे आगामी काळातच समोर येणार आहे.
पाहा संजय राऊत यांची संपूर्ण मुलाखतः