ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १७ - मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास अमृतांजन पुलाजवळ एक कंटेनर ऑईल टँकरला धडक देऊन निघून गेल्याने ऑइल चा टँकर लीक झाला. अमृतांजन जवळील उतारावर ही घटना घडल्याने रस्त्यावर सर्वत्र दूरवर ऑइल पसरले होते. यामुळे मुंबई कडून पुण्याकडे येणारी वाहतूक पहाटेपासून विस्कळीत झाली आहे.
मार्गावर सांडलेले ऑइल धुवून काढण्यात आयआरबी कंपनी व महामार्ग पोलीसांना यश आले आहे. त्यामुळे पहाटे काही काळ ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरु झालीय पण वाहनांच्या लांबवर रांगा लागल्याने ती संथ गतीने सुरु असून वाहतूक कोंडी पूर्ववत होण्यासाठी आजून काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
रविवारच्या सुट्टीमुळे आज लोणावळा व इतर पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी आज मुंबईकर पर्यटक सकाळीच बाहेर पडले मात्र द्रुतगती मार्गावर कोंडी झाल्याने त्यांना या कोंडीत अडकून पडावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.