जमीर काझी, मुंबईमहाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव करू पाहणाऱ्या आॅल इंडिया मजलिस -ए-इतेहद्दुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाने मुंबई व ठाणे वगळता राज्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत. पक्षांतर्गत वाढती गटबाजी व मतभेदामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असाऊद्दीन ओवेसींनी हा निर्णय घेतला आहे.गेल्या वर्षी वांद्रे विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. मात्र वांद्रे पोटनिवडणुकीत एमआयएमच्या उमेदवाराला डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की पत्करावी लागली. तेव्हापासून पक्षांतर्गत कुरबुरीच्या चर्चा चव्हाट्यावर आल्या होत्या. मात्र आगामी मुंबई व ठाण्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून येथील विद्यमान कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडीचे सरचिटणीस अक्रम खान यांची हकालपट्टी केल्यानंतर चिडलेल्या त्यांच्या समर्थकांनी गेल्या आठवड्यात भायखळ्यातील पक्षाचे आमदार अॅड. वारिस पठाण यांची भेट घेऊन पदाचे राजीनामे देण्याचे जाहीर केले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांत वादही झाला होता. नवीन कार्यकारिणीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून सक्षम, सुशिक्षित, समाजाच्या प्रश्नांची जाण असलेल्या कार्यकर्त्यांना स्थान दिले जाईल, असे खा. ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी कोअर कमिटीचे सदस्य सर्व जिल्ह्णांचे दौरे करून पाहणी करतील. त्यानंतर एप्रिलमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.आगामी मुंबई व ठाण्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून येथील विद्यमान कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडीचे सरचिटणीस अक्रम खान यांची हकालपट्टी केल्यानंतर चिडलेल्या त्यांच्या समर्थकांनी गेल्या आठवड्यात भायखळ्यातील पक्षाचे आमदार अॅड. वारिस पठाण यांची भेट घेऊन पदाचे राजीनामे देण्याचे जाहीर केले होते. कोअर कमिटीतील सदस्यसय्यद मोईन (नांदेड), अंजुम इनामदार (पुणे), मौलाना मेहफजुर, रहेमान, डॉ. गफार कादरी, पंडीत बोरडे (सर्व औरंगाबाद), मोहम्मद अली (लातूर), मोहम्मद सलीम (नागपूर), इब्राहिम अली अबू (नांदेड) व अॅड. विलास डोंगरे (नागपूर) महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढत आहे. नवीन व होतकरू, अभ्यासू कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. प्रत्येक पक्षात मतमतांतरे असतात, त्याचा अर्थ मोठे मतभेद, दुफळी निर्माण झाल्याचे समजणे चुकीचे आहे. पक्षाच्या पुनर्स्थापनेसाठी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून नवीन निवडीची प्रक्रिया लवकर सुरू केली जाईल.-आ.अहमद बाला, महाराष्ट्र प्रभारी, एमआयएम
कार्यकारिणी बरखास्त
By admin | Published: November 25, 2015 3:31 AM