शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

स्वातंत्र्यदिनापासून निर्बंधमुक्ती! मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, बार, सुरू; मंदिरे, प्रार्थनास्थळे, मल्टिप्लेक्स बंदच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 9:22 AM

यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतलेल्या निर्णयांची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली. दीर्घकाळापासून कोरोना प्रतिबंधाचा सामना करीत असलेल्या व्यावसायिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. (Rajesh Tope)

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल्स १५ ऑगस्टपासून दररोज रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मंगल कार्यालये, इनडोअर खेळ यांनाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मंदिरे, प्रार्थनास्थळे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आदी तूर्त बंदच राहतील. स्वातंत्र्यदिनापासून अनेक निर्बंधातून मुक्ती मिळत असल्याने व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. (Exemption from restrictions from Independence Day! Malls, shops, hotels, bars, start-ups; Temples, places of worship, multiplexes closed)

यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतलेल्या निर्णयांची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली. दीर्घकाळापासून कोरोना प्रतिबंधाचा सामना करीत असलेल्या व्यावसायिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स सर्व दिवशी रात्री १० पर्यंत सुरू ठेवता येतील. सोबतच हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. खासगी कार्यालये, आस्थापना, कंपन्या २४ तास सुरू ठेवता येतील. त्यामुळे कमी उपस्थितीत आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये खासगी कार्यालये सुरू राहू शकतील. मंगल कार्यालयांना ५० टक्के क्षमतेने व जास्तीत जास्त १०० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास परवानगी दिली आहे. 

खुल्या लॉनमधील लग्न सोहळ्यास २०० लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस यासारख्या इनडोअर खेळांनाही परवानगी देण्यात आली आहे. गरज लागल्यास पुन्हा लॉकडाऊन - टोपेराज्यात कोरोनाची तिसरी लाट आली आणि तिसरी लाट सुरू होताच ज्या दिवशी रुग्णांना ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्यादिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आहे त्या स्थितीमध्ये लॉकडाऊन लावून पुन्हा निर्बंध लागू केले जातील. याबाबतचाही निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

ते म्हणाले, राज्यात सध्या उद्योगांकडून १५०० ते १६०० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन उत्पादित केला जात आहे. दुसरीकडे, राज्यात ४५० पीएसए प्लांट उभारण्यात येत आहेत. त्यातील १४१ प्लांट सुरू झाले आहेत. येत्या महिनाभरात आणखी २०० प्लांट कार्यान्वित होतील. सर्व पीएसए प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर राज्यात दररोज ४०० ते ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होईल.

जवळपास सारेच सुरू; व्यापाऱ्यांना दिलासा- सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत सुरू- हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी- दुकान, मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांचे लसीकरण आवश्यक- शॉपिंग मॉल्समध्ये दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश- मंगल कार्यालयांना ५० टक्के क्षमतेत जास्तीत जास्त १०० नागरिकांच्या उपस्थितीला परवानगी- खुल्या लॉनमधील लग्न सोहळ्यासाठी २०० लोकांच्या उपस्थितीस मुभा- खासगी कार्यालये, आस्थापना, कंपन्या २४ तास सुरू ठेवता येणार- बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी इनडोअर खेळांना परवानगी- जिम्नॅशियम, योगसेंटर, सलून आणि स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी - राज्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajesh Topeराजेश टोपेMaharashtraमहाराष्ट्र