शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

आतबट्ट्याचा हंगाम, मका, मूग, सोयाबीन, उडदाचा एकरी खर्च निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:34 PM

पावसाचे आगमन झाले की, शेतशिवारात पेरणीची लगबग सुरू होते. पेरणीपूर्व मशागतीच्या तयारीपासून सुरू झालेला प्रवास शेतमाल बाजारात पोहोचल्यानंतर थांबतो.

- भागवत हिरेकर औरंगाबाद : पावसाचे आगमन झाले की, शेतशिवारात पेरणीची लगबग सुरू होते. पेरणीपूर्व मशागतीच्या तयारीपासून सुरू झालेला प्रवास शेतमाल बाजारात पोहोचल्यानंतर थांबतो. त्यामुळे खरिपात घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या खर्चाचा ताळेबंद शेतकरीही तयार करतो. यापैकीच मका, सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांच्या प्रति एकरी सरासरी खर्चावर टाकलेला दृष्टीक्षेप.मका : शेतकºयाची निकड भागवणारे आणि कमी वेळेत पैसा देणारे पीक म्हणून मका ओळखले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस मक्याचे क्षेत्र वाढत आहे. यासाठी एकरी खर्च बराच होतो. मका लागवड करायच्या जमिनीत अगोदर कपाशी असेल, तर नांगरणी आणि रोटा फिरविणे, यामुळे मशागतीच्या खर्च वाढतो.सोयाबीन : हे तेलबिया पिकांपैकी एक आहे. चांगले उत्पादन आणि बाजारभाव असल्याने या पिकाकडे शेतकºयांचा कल वाढत आहे. सोयाबीनच्या पूर्वमशागतीवर सरासरी २ हजार रुपये खर्च होतो. त्यानंतर, विद्यापीठाकडील बियाणे घेतल्यास २,०८० रुपये लागतात. त्यानंतर, लागवडीवर (पेरणी, मजुरी, खतासह) ३ हजार रुपये खर्च होतो.मूग आणि उडीद : ही दोन्ही डाळ पिके, तसेच यांच्या पाचोळ्यामुळे जमिनीचा पोतही टिकून राहतो. या दोन्ही पिकांवर शेतकºयांना फारसा खर्च करावा लागत नाही. मूळात शेतकरी हे आंतरपीक म्हणून घेतात. रब्बीतील पिकावर पूर्वमशागतीचा खर्च अवलंबून असतो.या पिकांच्या वाहतुकीचा खर्च मालाचे ठिकाण ते बाजारपेठ आणि वाहतुकीचे दर यावरच ठरतो.>मकाखर्चाचे स्वरूप खर्च (प्रति एकर)मशागत २ हजारपेरणी (मजुरीसह) २ हजारबियाणे १ हजार ५०० रूपयेखते २ हजारतण नियंत्रण १,५००कीड नियंत्रण १ हजारकाढणी ४ हजारमळणी २ हजारउत्पादन २५ क्विंटलएकूण खर्च १६ हजारबाजारभाव ११,०० ते १२,००प्रति क्विंटलसोयाबीनखर्चाचे स्वरूप खर्च (प्रति एकर)मशागत २ हजारपेरणी(खत,मजुरीसह) ३ हजारबियाणे २ हजार ८० रूपयेतण नियंत्रण १ हजार ५०० रूपयेकीड नियंत्रण २ हजारकाढणी, मळणी ३ हजारउत्पादन ६ क्विंटलएकूण खर्च १३,५८०बाजारभाव ३,२०० रूपयेमूग आणि उडीदखर्चाचे स्वरूप खर्च (प्रति एकर)मशागत २ हजारपेरणी (मजुरीसह) २ हजारबियाणे ७५० रूपयेखते २ हजारतण नियंत्रण १ हजार ५०० रूपयेकीड नियंत्रण १ हजार ५०० रूपयेकाढणी, मळणी १ हजारउत्पादन ४ ते ४.५ क्विंटलएकूण खर्च १०,७५०बाजारभाव ३,५०० ते ४ हजार प्रति क्विंटल>शेतकºयांनी खर्चात बचत होण्यासाठी कृषी विद्यापीठाचे सुधारित वाण वापरून स्वत: बियाणे तयार करावे. एकरी २६ किलो बियाणे पुरेसे असून, हे पीक घेताना धोके टाळण्यासाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पक्षी थांबे करावेत. बदलत्या वातावरणामुळे पावसात खंड पडतो. दोन पाळ्यांची पिकाला गरज निर्माण होते. संरक्षित पाण्याचे साठे शेतकºयांनी अगोदर तयार केले पाहिजेत. जमिनीतील आर्द्रता टिकविण्यासाठी सोयाबीनची पेरणी रुंद सरी वरंबा पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरेल.-डॉ. एस.पी. मेहत्रे,प्रभारी अधिकारी अखिल भारतीय सोयाबीन संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी>बहुतांश शेतकरी मुगाची आंतरपीक म्हणूनच लागवड करतात. हे पीक कमी कालवधीमध्ये येते. त्यामुळे जूनअखेरपर्यंतच शेतकºयांनी मुगाची पेरणी करणे फायदेशीर ठरेल. काढणीच्या काळातच पिकाला पावसामुळे धोका निर्माण होतो. कारण सतत दोन-तीन दिवस पाऊस राहिला, तर मुगाला कोंब येऊ लागतात. याचा फटका शेतकºयांना सहन करावा लागतो.- डॉ. जगदीश जहागीरदार,प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, बदनापूर

भारतीय हवामान खात्याने यंदा चांगला पाऊसकाळ असल्याचे भाकीत वर्तविले असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेली सलग चार वर्षे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकºयांच्या पदरात काहीच पडले नाही. विशेषत: पावसावर अवलंबून असलेल्या खरीप पिकांचे उत्पादन आणि खर्चात ताळमेळ न बसल्याने, कोरडवाहू शेती करणाºया शेकडो शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली.महाराष्टÑात आत्महत्या केलेल्या शेतकºयांची आर्थिक आणि भौगोलिक आकडेवारी पाहिली, तर प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आणि तूर अशी खरिपाची पिके घेणाºया शेतकºयांची संख्या अधिक असल्याचे दिसून येईल. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतीचे अर्थशास्त्र बिघडल्यामुळे या भागात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोयाबीन आणि तुरीची यंदा हमीभावाने खरेदी करण्यात राज्य सरकारने चालढकल केल्यामुळे व्यापाºयांनी शेतकºयांच अक्षरश: लूट केली.