लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर/नाशिक : राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी समाधानकारक नाही. त्यात अनेक उणिवा असल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. शेतकऱ्यांचे सरसकट सर्व कर्ज माफ करावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठी वेळ पडल्यास सरकार बाहेर पडू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.रविवारी पुणतांबा, येवला, पिंपळगाव येथील शेतकऱ्यांशी येथे आयोजित उध्दव ठाकरे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, पुणतांबेकरांनी इतिहास घडविला. शेतकऱ्यांच्या संपाला आम्ही पूर्ण पाठिंबा दिला होता. संपात उतरलेल्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले गेले. आंदोलनकर्त्यांवर लाठ्या, काठ्या चालवून गुन्हे दाखल केले असतील त्याची यादी मला द्या. सरकारला सर्व गुन्हे काढावीच लागतील. वार करायचा असेल तर समोरुन करा. अनेक मोठ्या उद्योगपतींनी आठ ते २० लाख कोटी कर्ज बुडविले. मात्र आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठीवर या सरकारने वळ उमटविले. मला सत्तेची पर्वा नाही. शिवसेनेचा दबाव सरकारवर राहणारच, असे ठाकरे यांनी ठणकावले. शेतकरी संपाबाबत विरोधी पक्षनेते म्हणतात, सरकारमधून बाहेर पडा. आम्ही बाहेर पडतो. पण तुम्ही आतमध्ये जाऊन गुलगलू करु नका. विखे पिता-पुत्रांना शिवसेनेने मंत्रीपदे दिली. आधी घरातलं भांडण घरात मिटवा, उगाच तुमच्या भांडणात शाळेचा गळा घोटू देऊ नका, अशा शब्दात ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा समाचार घेतला.सरकारचे काय करायचे ते पाहतो...कर्जमाफीसाठी एकजुटीने आंदोलन करणारा शेतकरी चोर, गुन्हेगार नाही, त्याच्यावरचे गुन्हे मागे घ्या, अन्यथा सरकारचा काय करायचे ते पहातो असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिला.
संपूर्ण कर्जमाफीसाठी सत्तेतून बाहेर पडू
By admin | Published: June 26, 2017 1:59 AM