शहरं
Join us  
Trending Stories
1
रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला
2
प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर
3
कुर्ल्यात बसने चिरडलेल्या महिलेच्या हातातून काढल्या सोन्याच्या बांगड्या; पोलिसांकडून शोध सुरु
4
शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक
5
Stock Market News: निफ्टीच्या विकली एक्सपायरीवर बाजार सुस्त; सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट, मेटल-IT स्टॉक्स मजबूत
6
आणखी भव्यदिव्य होणार शाहरुखचा 'मन्नत' बंगला, कोट्यवधींचा खर्च करुन करणार मोठा बदल
7
तुमची पत्नी ५ स्मार्ट पद्धतीनं वाचवू शकते तुमचा Income Tax! कमाईही करू शकते डबल; म्हणाल 'वाह क्या बात है!'
8
"दोन नात्यात राहणं सोपं नव्हतं, पण..", रीना रॉय आणि पत्नीला एकत्र डेट करत होते शत्रुघ्न सिन्हा, दिली कबुली
9
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
10
कुणी महिन्याला ५० हजार कमावतं तर कुणी १ लाख...; 'या' गावातील लोकांचं आयुष्यच बदललं
11
बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू; ५६ तासांनी बाहेर काढल्यानंतर थांबला होता श्वास
12
'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ
13
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
14
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
15
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
16
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
17
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
18
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
19
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
20
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा

गुगलवरून शोधले विदेशी फळ; उत्पन्न एकरी 10 लाख; मुरमाड जमिनीत फुलली शेतकऱ्याची यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 7:11 AM

सुरुवातीला अमेरिका, बंगळुरूवरून ५५ झाडे मागवून मुरमाड जमिनीत लागवड केली. ती आता ३०० झाली. आता याच विदेशी फळाने शेतकऱ्याला लखपती केले.

- सोमनाथ खताळलोकमत न्यूज नेटवर्कबीड : शिक्षण बारावी पास. नंतर कृषी डिप्लोमा. घरी शेती पाच एकर पण सर्व मुरमाड. उत्पन्न तर घ्यायचे पण कसे, हा प्रश्न. अखेर विदेशी फळांचा गुगलवरून शोध घेतला. यूट्यूबवर व्हिडीओ पाहिले. त्यात ॲव्हाेकॅडो याची माहिती मिळाली. सुरुवातीला अमेरिका, बंगळुरूवरून ५५ झाडे मागवून मुरमाड जमिनीत लागवड केली. ती आता ३०० झाली. आता याच विदेशी फळाने शेतकऱ्याला लखपती केले असून एकरी १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न देत आहेत. परमेश्वर आबासाहेब थोरात (वय ३७, शिवणी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 

लागवडीनंतर कधी मिळते फळ?ॲव्होकॅडोची लागवड करण्यापूर्वी जमिनीत शेणखत, गांडूळ खत, रासायनिक खत टाकले जाते. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात फळांची झाडे धुऊन स्वच्छ केली जातात. गरजेनुसार कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते. याच कालावधीत फुले येतात. फळे लागल्यापासून ते तोडण्यापर्यंत हा कालावधी सहा महिन्यांचा असतो. जून, जुलैमध्ये फळे तोडतात. वर्षातून एकवेळाच याचे उत्पादन घेता येते.  

अशी आली बीडला झाडेअमेरिकेहून थेट झाडे, बिया किंवा वस्तू थेट आणण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे शेतकरी थोरात यांनी यासाठी त्यांच्या उद्योजक मित्राची मदत घेतली.त्याच्या मार्फत अमेरिकेतील विद्यापीठातून बंगळुरू विद्यापीठात झाडे आणण्यात आली. तेथून पुढे ही झाडे बीडला आणण्यात आली. कृषीचे शिक्षण झालेले असल्याने याच झाडांचे कलम करून नवे रोप तयार केल्याचे थोरात म्हणाले.  

ऑनलाइन केला अभ्यास२०१७ साली शेतकरी थोरात यांनी  गुगलवरून प्रगतशील देशांमधील विविध पिकांची माहिती घेतली.यात इस्रायलमधील ॲव्हाेकॅडोची माहिती मिळाली. यासंदर्भात यूट्यूबवरून अभ्यास केला. याचे फायदे, तोटे यासह बाजारभावाचीही माहिती घेतली व लागवडीचा निर्णय घेतला.n२०१८ मध्ये त्यांनी बंगळुरूमधून ५० झाडे आणली. २०२१ साली त्यांना पहिले उत्पन्न मिळाले. सर्व खर्च जाऊन यातून तीन ते चार लाख रुपये खिशात आले. २०२४ मध्ये त्यांनी  एक एकरमध्ये ३०० झाडे लावली.nयामध्ये त्यांना सर्व खर्च जाऊन १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे. ही फळे आरोग्यासाठी गुणकारी असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. स्थानिक बाजारासह देशाबाहेरूनही मागणी होते. 

ॲव्होकॅडो फळाचे वजन साधारण २०० ते ५०० ग्रॅमपर्यंत असते. याला किलोप्रमाणे २०० ते ५०० रुपयांपर्यंत भाव मिळतो.  हे झाड लिंबू, मोसंबी याप्रमाणे दिसत असले तरी ते आंब्याच्या झाडासारखे होते. लागवड केल्यानंतर त्याचे आयुष्य हे जवळपास ५० वर्षे इतके आहे.     - परमेश्वर थोरात, प्रगतशील शेतकरी 

टॅग्स :Farmerशेतकरी