शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वीच, मुख्यमंत्र्यांची ‘लोकमत’ला माहिती

By यदू जोशी | Published: November 22, 2017 6:28 AM

मुंबई : मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी निश्चितपणे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

मुंबई : मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी निश्चितपणे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला सांगितले. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची सोमवारी रात्री अहमदाबादमध्ये मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली तेव्हाच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याचे आणि शहांनी विस्तारास हिरवा झेंडा दाखविल्याचे वृत्त लोकमतने मंगळवारच्या अंकात दिले. ‘अधिवेशनापूर्वी विस्तार करणार हे आपण यापूर्वीच सांगितले असून त्यानुसार तो होईल’, असे मुख्यमंत्री आज म्हणाले.अधिवेशन नागपुरात ११ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे या महिन्याअखेर विस्तार होईल असे समजते. भाजपाच्याच नव्हे तर शिवसेनेच्याही मंत्र्यांमध्ये फेरबदल होऊ शकतो. याबाबतचे संकेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत, असे समजते.>एकट्या राणेंसाठी नाहीमंत्रिमंडळाचा विस्तार हा केवळ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सामावून घेण्यासाठी असेल काय, या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, तसे नाही. हा एकूणच विस्तार असेल. विस्ताराबाबत चर्चेसाठी पंतप्रधान मोदी यांना भेटणार असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. ‘मी पंतप्रधानांची भेट घेणार आहे, पण त्याबाबत तारीख निश्चित नाही आणि ती विस्तारासाठी नसेल’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे