शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

सिंचन घोटाळयात अपेक्षित कारवाई नक्की होईल - गिरीश महाजन

By admin | Published: July 11, 2017 4:39 PM

लोकमत वॉटर समिट 2017 च्या दुस-या सत्राला सुरुवात झाली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11 - लोकमत वॉटर समिट 2017 च्या दुस-या सत्राला सुरुवात झाली आहे. दुस-या सत्रात जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, राम शिंदे, बबनराव लोणीकर यांची ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर मुलाखत घेत आहेत. 
 
सिंचन घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई कधी? 
उत्तर - चौकशी सुरु आहे. गोसीखुर्द मध्ये नवे ठेकेदार आलेत, तुम्हाला अपेक्षित कारवाई नक्की होईल. काही ठेकेदारांवर कारवाई केली आहे. प्रकल्पांसाठी पैसा उपलब्ध होतोय.275 प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण करायचे आहेत, साडेसात लक्ष हेक्टर जमीन अजून सिंचनाखाली आणायची आहे असे गिरीश महाजन यांनी सांगितले. 
 
भूसंपादनसाठीचे धोरण कसे राबवतोय...? 
उत्तर - पाच पट अधिक पैसा देतोय. सोळा हजार हेक्टर जमीनीचे संपादन केले आहे. जमीनीखालून पाणी नेणार आहोत, त्यातून गळती वाचेल, भूसंपादनही कमी होईल असे त्यांनी सांगितले. 
 
शेतीसाठी निधीची कमतरता नाही, शेतीपर्यंत पाणी पोहोचवायचे आहे. 57-58 हजार कोटींचे नियोजन आहे अशी माहिती त्यांनी दिली. कोकणातील एकाच ठेकेदाराला काम मिळायची, नियमबाह्य कामे दिली गेली. अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण करत आहोत असे गिरीश महाजन म्हणाले. 
 
धरणांमधील गाळ काढून पुर्नजीवन करायचे आहे. रेस्ट हाऊस बीओटी तत्वावर देणार आहोत. हातनूर धरण 50 टक्के गाळाने भरले आहे. नवीन धरण बांधणे अवघड बनलयं. उजनीचे गाळ काढण्याचे टेंडर काढलयं. तेथे वाळू, माती दोन्ही आहेत. त्यातून धरणांची क्षमता वाढेल असे गिरीश महाजन म्हणाले. 
 
आणखी वाचा 
 
‘लोकमत’ मीडियाचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा यांचा राम शिंदेंना प्रश्न जलसंधारण आयुक्तालयासाठी आपण काय करताय ?
उत्तर - जलसंधारणासाठी 25 वर्षे आस्थापना नव्हती. आता या सरकारमध्ये वेगाने काम सुरु आहे. औरंगाबादला आयुक्तालयासाठी प्रयत्न सुरु आहे.
 
राम शिंदेंना प्रश्न जलयुक्त शिवारची सध्याची स्थिती काय? 
उत्तर - जलयुक्त शिवार योजनेचा फायदा लोकांना झाला. प्रशासकीय पातळीवर काम वेगाने सुरु आहे. 2019 मध्ये टंचाईमुक्त,
दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणार आहोत. ते आम्ही साधणारच.
राज्य सरकारचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांना प्रश्न प्रशासकीय मान्यता प्रलंबित का राहतात?
 उत्तर - तांत्रिक तपासणी करुन, वित्तीय समितीतून मान्यता घेतली जाते. नस्ती पध्दत आता आम्ही वापरत नाही. वेगवान निर्णय होत आहेत. कर्नाटक राज्याला लागून असलेल्या शेतीसाठी बंद पाईपलाईनमधून पाणी सोडणार आहोत. 
 
जलसमृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत लोकमत समूहातर्फे आज लोकमत वॉटर समिट 2017चे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन करण्यात आले. तर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांची या समिटला विशेष अतिथी म्हणून उपस्थिती आहे.
 
लोकमत मीडियाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी उद्घाटन सत्रात स्वागतपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी लोकमतच्या वाचकांचे आभार मानले. जलदूतांच्या जलकथांना राज्यातील लोकमतच्या वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना दर्डा म्हणाले, जलसंधारणाची राज्याला, मराठवाड्यासारख्या भागांना अतीव गरज आहे. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे गरजेचे आहे, इस्रायलचे उदाहरण जगाने समोर ठेवावे. जलयुक्त शिवारचे यश महत्त्वाचे, पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणावा. यावेळी बोलताना त्यांनी जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या कामाचा गौरवही केला.
 
जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी यावेळी बोलताना भारतातील पाण्याची स्थिती आण जलयुक्त शिवाराचे काम का गरजेच आहे याविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, जगातील पाण्याची उपलब्धता दोन हजार वर्षांपूर्वी जेवढी होती, तेवढीच आजही आहे, पण लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे पाणी नियोजन महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे समाजाला पाणी संवर्धन करावे लागेल, त्याशिवाय देश पाणीदार बनू शकणार नाही.
 
लोकमत समूह सामाजिक बांधिलकी जपणारा समूह आहे. जनसामान्यांचा आवाज म्हणजेच लोकमत असे कौतुक गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी लोकमतचे केले. त्यांनी लोकमतने जलयुक्त शिवाराच्या कामचा घेतलेल्या आढाव्याचे कौतुकही केले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील जलयुक्त शिवारचे कौतुक केले आहे, प्रथमच शेतीचा विचार गांभीर्याने करण्याच आला आहे. जलयुक्त शिवारमुळे राज्यात क्रांती झाली. जलयुक्त शिवार ही लोक चळवळ आहे. जलयुक्त शिवारासाठी लोकांनी भरपूर मदत केली. जनसामान्यांनी जलयुक्त शिवरासाठी 540 कोटी उभे केल्याचे राम शिंदे म्हणाले.