लोकमत टीम
मुंबई : मुलगी, बहिणी, पत्नी तर कुठे नात असे काहीसे चित्र यंदा भांडुपमधल्या महिला राजमध्ये पहावयास मिळत आहे. एस विभातील १४ प्रभागांपैकी ११ प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित झाल्याने विद्यमान नगरसेवक, नेते मंडळींनी आपल्या कुटुंबियातील महिलांना पुढे करण्यास सुरुवात केली आहे. यातूनच पक्षांतर्गतच हेवेदावे सुरु झाले आहे. अशात रुसव्या फुगव्यातून कुठे मैत्री तुटली तर कुठे नाते तुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे एस वॉर्डातील यंदाची निवडणूक चर्चेचा विषय ठरणार आहे. यातूनच अनुभवी चेहऱ्यांना आव्हान देत काहीसे नवे चेहरे यंदाच्या निवडणूकीसाठी सज्ज झाल्याने यात तरुणाईचा अनोखा रंग मिसळताना दिसत आहे. मागील निवडणूकीत भांडुप एस विभाग अंतर्गत एकूण १३ प्रभाग होते. यंदा एक प्रभाग वाढवून एकूण १४ प्रभागांची रचना केलेली आहे. मागील निरडणूकीत एस विभागात मनसे पक्षाला लोकांनी भरभरुन मतदान केल्याने त्यांचे एकूण ५ नगरसेवक निवडून आले होते. कॉग्रेसचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक तसेच शिवसेनेचे चार व एक अपक्ष नगरसेवक निवडून आला होता. अपक्ष उमेदवार मंगेश पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपाने येथे खाते खोलले आहे. मात्र यंदा भांडुपमध्ये महिलांना अधिक प्राधान्य दिल्याने नवा प्रभाग क्र. ११४, ११५ व १२० हे खुले प्रभाग असल्याने सर्वचं राजकिय पक्षाचे दिग्गज पुरुष उमेदवार उपरोक्त तीन खुल्या प्रभागात मतदारांची चाचपणी करीत आहेत. अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. येथेही महिला उमेदवार धावपळ करत असल्याने त्यांच्या उमेदवारांच्या रागात भर पडताना दिसली. त्यात महिला राजमुळे अनेक पक्षांतील नेतेमंडळींना हव्या तशा महिला उमेदवारही मिळत नसल्याचे चित्रही येथे पहावयास मिळत आहे. भांडुपमधील काही प्रभागांमध्ये अनुभवी महिला उमेदवारांना टक्कर देण्यासाठी तरुणीही रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे एरवी काकू, ताई म्हणत मागे फिरणारी आपल्यासमोर उभी राहत असल्याने अंतर्गत धुसफूसही वाढली आहे. भांडुपमध्ये ऐतिहासिक असलेल्या शिवाजी तलावाच्या मुद्यावर उमेदवार रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे याच्या श्रेयीकरणावरुन पक्षां- पक्षांत वादही उफाळले आहेत. या भागांमध्ये भाजपच्या नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत भाजपला पडलेल्या मतदानाचा अभ्यास करुन, त्यांनी प्रत्येक प्रभाग भाजप बहुल कसा बनेल याचा विचार केला आहे. या अनुषंगाने मागील निवडणूकीतील तीन प्रभागांना विभागून एक प्रभाग नव्याने बनविला यामध्ये सुमारे १५ ते २० हजार भाजपप्रणित मतदारांना कॉम्पेक्ट केलेले दिसत आहेत. त्यामुळे या निवडणूकीदरम्यान अटीतटीचा सामना पहावयास मिळणार आहे. एस विभातील कोकणी मतदारांनाही आपलेसे करण्यासाठी भाजप नेत्यांनी सुरुवात केली आहे. तर पक्षांतर्गत चर्चेत राहण्यासाठी मिळेत तो मुद्दा घेत उमेदवार सज्ज झाले आहेत. .............प्रभाग क्रमांक - १०९आरक्षणखुला (महिला)लोकसंख्या एकूण- ५६,९०६अनुसूचित जाती - ३५९०अनुसूचित जमाती -९४९ व्याप्ती - तुळशेतपाडा, तानाजीवाडी, टेंबीपाडा. भांडूप-तानसा पाईपलाईन ........................प्रभाग क्रमांक - ११०आरक्षणखुला (महिला)लोकसंख्या -एकूण- ५२,०३५अनुसूचित जाती - १८७८अनुसूचित जमाती - २८३व्याप्ती - राजीव गांधी नगर, एमएमआरडीए कॉलनी, सुभाषनगर, भांडूप सोनापूर....................प्रभाग क्रमांक - १११आरक्षणखुला (महिला)लोकसंख्या - एकूण- ५८३६६अनुसूचित जाती - ४४१७अनुसूचित जमाती - १३७०व्याप्ती - किर्तीनगर, भवानीनगर, टाटानगर, शामनगरदातार कॉलनी, साईनगर , रुक्मिणी नगर .....................प्रभाग क्रमांक - ११२आरक्षणखुला (महिला)लोकसंख्या - एकूण- ५१२७३अनुसूचित जाती - ३०६९अनुसूचित जमाती - ५३१व्याप्ती - निर्मल नगर, जयदेवसिंग नगर, पंजाब कॉलनी, राम नगर, दिना बामा ईस्टेट, आंबेडकर नगर, एमएमआरडीए कॉलनी......................प्रभाग क्रमांक - ११३आरक्षणखुला (महिला)लोकसंख्या - एकूण- ५१२५२अनुसूचित जाती - ३४९९अनुसूचित जमाती - ७३३व्याप्ती - मिलिंद नगर, गांव देवी भांडूप (पश्चिम विभाग)सर्वोदय नगर, सेंट अँथोनी नगर, इंडस्ट्रीयल इस्टेट......................प्रभाग क्रमांक- ११४आरक्षणखुलालोकसंख्याएकूण-५०८३७अनुसूचित जाती -२४२८अनुसूचित जमाती -२७७व्याप्ती - क्रांती नगर,आंनद नगर, माता रमाबाई आंबेडकर नगर, सर्वेश्वर हॉस्पिटल,एस.वी.बी कॉलेड आॅफ कॉमर्स ................प्रभाग क्रमांक - ११५आरक्षणखुलालोकसंख्या एकूण- ४८३३६अनुसूचित जाती - १९४२अनुसूचित जमाती - ४३७व्याप्ती - कोकण नगर, समर्थ नगर, जमील नगर,पठाण कॉलनी, उत्कर्ष नगर, महाराष्ट्र नगर ........................प्रभाग क्रमांक - ११६आरक्षणखुला (महिला)लोकसंख्या -एकूण- ५४७७६अनुसूचित जाती - ५७८१अनुसूचित जमाती - ५८१व्याप्ती - हनूमान नगर, न्यू कॉलनी, महात्मा ज्योतिबा फुले नगर, हॉली ट्रीनिटी चर्च ....................प्रभाग क्रमांक - ११७आरक्षणइतर मागासवर्गीय (महिला)लोकसंख्या - एकूण- ५५३३१अनुसूचित जाती - ४४५३अनुसूचित जमाती - ५११व्याप्ती - कांजूर व्हिलेज, ए़न.सी.एच. कॉलनी, इंद्रिरा नगर, मिराशी नगर .....................प्रभाग क्रमांक - ११८आरक्षणखुलालोकसंख्या - एकूण- ५५९६६अनुसूचित जाती - १००६८ अनुसूचित जमाती - ३६७व्याप्ती - कन्नमवार नगर १ व २, टागोर नगर, हनुमान नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, अस्मिता कॉलेज आटर््स अॅन्ड कॉमर्स ......................प्रभाग क्रमांक - ११९आरक्षणइतर मागासवर्गीय (महिला)लोकसंख्या एकूण- ५९०३१अनुसूचित जाती -५१६७ अनुसूचित जमाती - ३५९व्याप्ती - भारत नगर, राजीव गांधी नगर,विक्रोळी विद्यालय, अशोक नगर,जय भवानी चाळ, काळाघोडा रामवाडी...................... प्रभाग क्रमांक - १२०आरक्षणखुला (महिला)लोकसंख्या एकूण- ५५०८४अनुसूचित जाती -४८५५ अनुसूचित जमाती - ४७४व्याप्ती - सुर्या नगर, चंदन नगर, गोदरेड हिल साईड कॉलनी, लोकमान्य नगर, सिप्ला कंपनी ...................... प्रभाग क्रमांक - १२१आरक्षणअनुसूचित जाती (महिला)लोकसंख्या एकूण- ४६१८६अनुसूचित जाती -५५७६ अनुसूचित जमाती - २१९८व्याप्ती - आयआयटी पवई, पासपोली, मयुर नगर, पवई लेक, मोरारजी नगर...................... प्रभाग क्रमांक - १२२आरक्षणइतर मागासवर्ग (महिला)लोकसंख्या एकूण- ४७७२६अनुसूचित जाती -४०९० अनुसूचित जमाती - ५३९व्याप्ती - हिरानंदानी गार्डन , साईनाथ नगर, पंचकुटी गणेश नगर, म्हाडा कॉलनी, जलवायू विहार, रमाबाई आंबेडकर नगर, ----------------------------------------- २०१२ मधील विजयी आणि पराभूत उमेदवार (जुन्या रचनेनुसार)वॉर्ड क्र विजयी उमेदवारप्राप्त मते पराभूत उमेदवारप्राप्त मते१०४सुरेश हरिश्चंद्र कोपरकर (काँग्रेस)८५९९राजाराम दिनकर गव्हाणे(मनसे)४६२०१०५मंगेश नारायण पवार (अपक्ष)६९६५हरिनक्षी मोहन चैरथ (मनसे)६८०५१०६रमेश गजानन कोरगावकर (शिवसेना)(९४८४)संतोष बी. चव्हाण (मनसे)५५९६१०७अनिषा अमोल माजगावकर (मनसे)१०७०५संगीता नरेश पेडणेकर (शिवसेना)७३०५१०८रुपेश वायंगणकर (मनसे)९७८३राजेंद्र हरिषचंद्र मोकल(राष्ट्रवादी)८५९७१०९वैष्णवी विजय सरफरे(मनसे) ८८९९ प्रमिला कमलाकर पाटील (अपक्ष) ६६४१११०धनंजय सदाशिव पिसाळ (राष्ट्रवादी) ११७५३विनोद रामचंद्र शिंदे (मनसे) ९०३९१११अशोक धर्मराज पाटील (शिवसेना) ६५५८रविंद्र नारायण कदम (मनसे)४७९२११२प्रियांका सुर्यकांत श्रुगांरे (मनसे) ९०३५शोभा गौतम कदम (रिपाइं- ए) २३७९११३तावजी सहदेव गोरुले (शिवसेना) ८९३६अब्दूल रेहमान अन्सारी(राष्ट्रवादी) ७००६११४विश्वास तुकाराम शिंदे (शिवसेना) ७९०९प्रणिल विक्रम नायर ( काँग्रेस)५३१५११५चंदन सितरंजन शर्मा (राष्ट्रवादी)६८९७ भवानीशंकर हरिश्चंद्र शर्मा (भाजप) ४५६३११६अविनाश भास्कर सावंत (मनसे)३६६१अरविंद शंकर शिंदे (शिवसेना) ३३५७.......................................................(एन वॉर्ड)११७डॉ. भारती सुबोध भावदाने (शिवसेना) ११३७७ दामिनी दत्तात्रय बसणकर (मनसे) ६४१६११८हारुन युसूफ खान (राष्ट्रवादी) ९५६७ गणेश अर्जुन चुक्कल (मनसे) ४५०३११९संजय भालेराव (मनसे) १०७६६सरस्वती गजानन भोसले(शिवसेना) ६६३०१२०प्रतिक्षा राजू घुगे(राष्ट्रवादी)७८२० निर्मला सुभाष पवार (शिवसेना) ७०२५१२१रितू राजेश तावडे (भाजप)७०६९भारती बाबूराव मोरे( मनसे) ५८०६१२२ दिपकबाबा हांडे (अपक्ष) ८५५९ कोमल अलियास शिर्के साई नगरकर (शिवसेना)६५३८