वाशिम: एक दोन नव्हे तर तब्बल सोळा वर्षाच्या कालखंडात ह्ययोग्य उपचारह्ण न झाल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. बहुतांश आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. औषधांचा प्रचंड तुटवडा आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाबाबत तर न बोललेलेच बरे. जिल्ह्याच्या निर्मितीनंतरही येथे उपजिल्हा रुग्णालयाचा पॅटर्नच कार्यरत आहे. तज्ज्ञ डॉक्टर नाहीत, आहेत ते डॉक्टर कसे तरी जगन्नाथाच्या रथाप्रमाणे रूग्णालयाचा गाडा ओढत आहेत. अद्ययावत यंत्रसामग्री व तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांच्या माथ्यावर ह्यरेफर टू अकोलाह्ण असाच शेरा मारला जातो.जिल्हा निर्मितीपूर्वी वाशिम येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत होते. यामध्ये १00 खाटांची व्यवस्था होती. सन १९९८ ला वाशिम जिल्ह्याची नव्याने निर्मिती झाली, तेव्हा जिल्हावासियांना आरोग्य सेवा पुरविण्यात उपजिल्हा रुग्णालय कुचकामी ठरू लागले होते. सोबतच अकोला येथून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा कारभार पाहणे जिकिरीचे ठरू लागले होते. २00१ मध्ये शासनाने जिल्हा शल्यचिकित्सकांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून वाशिमच्या उपजिल्हा रुग्णालयाचे रूपांतर जिल्हा रुग्णालयात झाले. जिल्हा रुग्णालय झाले असले तरी पॅटर्न मात्र उपजिल्हा रुग्णालयाचाच कायम ठेवण्यात आला होता. खाटांची पूर्वी एवढीच, १00 ठेवण्यात आली. कर्मचार्यांची संख्याही त्याच पॅटर्ननुसार ठेवण्यात आली. आवश्यक यंत्रसामग्री तथा सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. रुग्णालयात ट्रामा सेंटर नाही, व्हेंटिलेटर नाही, सिटीस्कॅन नाही. याशिवाय इतरही आवश्यक यंत्रसामग्री व तज्ज्ञांचा अभाव आहे. त्यामुळे गंभीर रूग्णांना पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठविण्यात येते. विशेषत: गर्भवती महिलांची आरोग्य सेवेअभावी कुचंबना होत आहे.