जयशंकर गुप्त- नवी दिल्लीकेंद्र सरकारने इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत सन २०१४-१५ मध्ये विदर्भासह महाराष्ट्रात १ लाख ७१ हजार ७२२ घरांच्या बांधकामासाठी ९४५९९़३७१ लाख रुपये जारी केले आहेत़ याशिवाय या योजनेच्या समीक्षेसाठी तज्ज्ञांचा एक गट गठित करण्यात आला आहे़खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी विचारलेल्या एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी मंगळवारी ही माहिती दिली़ त्यांनी संगितले की, १२ व्या पंचवार्षिक योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली योजना आयोगाने २४ जून २०११ रोजी इंदिरा आवास योजनेसंदर्भात २० सदस्यीय कृतिगट गठित केला होता़ या योजनेच्या समीक्षेसाठी अशाप्रकारच्या कुठल्या तज्ज्ञांचा गट स्थापन केल्याबाबत सरकारला माहिती आहे का आणि असेल तर या गटाने काय शिफारशी केल्या, अशी विचारणा खासदार दर्डा यांनी केली होती़ या शिफारसी कधीपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे आणि याअंतर्गत विदर्भातील कार्याची काय स्थिती आहे, अशी माहितीही त्यांनी विचारली होती़ भगत यांनी सांगितले की, तज्ज्ञांच्या गटाने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारशी केल्या आहेत़ या योजनेंतर्गत मदतीत वाढ, राज्य निधीचा वापर, डीआरआयअंतर्गत कर्जात वाढ, वासभूमी खरेदीसाठीच्या मदतीत वाढ, प्रशासकीय खर्चाची तरतूद अशा सूचनांचा समावेश आहे़ यापैकी काही शिफारशी मान्य करून १ मार्च २०१३ पासून अमलात आणल्या आहेत़ इंदिरा आवास योजनेंतर्गत मैदानी क्षेत्रासाठीची मदत ४५ हजारांवरून ७० हजार, पहाडी आणि दुर्गम जिल्ह्णांसाठी ४८,५०० रुपयांवरून वाढवून ७५,००० हजार, वासभूमीच्या खरेदीसाठीची मदत २० हजार रूपये करणे तसेच ४ टक्के प्रशासकीय खर्चाच्या शिफारशीचा समावेश आहे़च् योजनेअंतर्गत मदतीत वाढच्राज्य निधीचा वापरच्डीआरआयअंतर्गत कर्जात वाढच्वासभूमी खरेदीसाठीच्या मदतीत वाढच्प्रशासकीय खर्चाची तरतूद
इंदिरा आवास योजनेच्या समीक्षेसाठी तज्ज्ञांचा गट
By admin | Published: March 04, 2015 1:47 AM