काँग्रेस राजकारणातून 'एक्सपायर' : सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 10:44 AM2019-05-30T10:44:44+5:302019-05-30T11:44:24+5:30

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर कॉंग्रेसला उतरती कळा लागली असल्याची चर्चा आहे.

 Expire from Congress politics Sudhir Mungantiwar | काँग्रेस राजकारणातून 'एक्सपायर' : सुधीर मुनगंटीवार

काँग्रेस राजकारणातून 'एक्सपायर' : सुधीर मुनगंटीवार

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर कॉंग्रेसला उतरती कळा लागली असल्याची चर्चा आहे. विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलसह अनेक कॉंग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना, राजकरणात काँग्रेसची 'एक्सपायरी डेट' संपली असल्याचा खोचक टोला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. नागपूर येथील पत्रकार परिषेदत ते बोलत होते.


ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीं म्हणतात की, निस्वार्थीपणे राजकीय सेवा केली पाहिजे, त्यानुसार कॉंग्रेसमध्ये असलेल्या चांगल्या आणि निस्वार्थीपणे राजकीय सेवा करणाऱ्या लोकांना भाजपमध्ये घेतले जाईल. कॉंग्रेसमध्ये सुद्धा आजही काही मोजकी लोकं कोणतेही अपेक्षा न ठेवता काम करतात अशा लोकांना संधी दिली जाईल असे मुनगंटीवार म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, औषधाची ज्याप्रमाणे एक्सपायरी डेट संपते, त्याचप्रमाणे काँग्रेसचीही राजकरणात एक्सपायरी डेट संपली आहे.


लोकसभा निवडणुकीपूर्वीच विखेंनी कॉंग्रेसचा हात सोडला होता. त्याचवेळी औरंगाबादमधील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन काम केले. त्यानंतर आता कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे सत्तार यांनी खुलासा केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसला राज्यात अपयशाचे ग्रहण लागले म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

Web Title:  Expire from Congress politics Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.