शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सहा कोटींची फसवणूक उघड

By admin | Published: October 12, 2016 6:38 AM

व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) या सेवेद्वारे अमेरिकन नागरिकांना गंडा घालून त्यांच्याकडून पाच कोटी ९१ लाख ५० हजार ७०४ इतकी रक्कम उकळल्याचे ७२ पैकी सात जणांच्या चौकशीत उघड

जितेंंद्र कालेकर / ठाणेव्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) या सेवेद्वारे अमेरिकन नागरिकांना गंडा घालून त्यांच्याकडून पाच कोटी ९१ लाख ५० हजार ७०४ इतकी रक्कम उकळल्याचे ७२ पैकी सात जणांच्या चौकशीत उघड झाले आहे. त्यांनी बनविलेल्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपच्या सखोल पडताळणीमध्ये ही माहिती उघड झाल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात सांगितले. कंपनीत महत्त्वाच्या पदावरील कर्मचाऱ्यांनी व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप बनविला होता. त्याद्वारे किती परदेशी लोकांकडून किती डॉलर पैसे काढले, याच्या नोंदीही हस्तगत केलेल्या मोबाईलमधून सहायक पोलीस आयुक्त मुमूंद हातोटे, वरिष्ठ निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाला मिळाल्या आहेत. नवोज उर्फ कबीर वर्धन गुप्ता या व्यवस्थापकाच्या ग्रुपने दोन लाख १६ हजार ६६६ डॉलर (एक कोटी ४३ लाख रुपये) अमेरिकन नागरिकांकडून उकळल्याचे स्पष्ट झाले. गोविंद ठाकूर आणि अंकित गुप्ता या व्यवस्थापकांकडून तीन लाख ४६ हजार ३९५ ची कॉल सेंटरची सामुग्री जप्त केली. त्यांनी दीड लाख डॉलर अमेरिकन नागरिकांकडून उकळल्याचे उघड झाले. तर अर्जून वासूदेव या व्यवस्थापकाच्या चौकशीतूनही बरीच माहिती उघड झाली. त्याच्याकडून कॉलसेंटर कर्मचाऱ्यांच्या पगाराची ८५ हजार ३७० इतकी रोकड आणि काही उपकरणे जप्त केली. १० सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर २०१६ या एक अवघ्या महिन्यांच्या कालावधीत त्याच्या टीमने एक लाख ७४ हजार ४०५ डॉलर (एक कोटी १५ लाख १० हजार ७३० रुपये) इतकी फसवणूक केली आहे. जॉनसन डॉन्टीस या आयटी एक्सपर्टच्या ग्रुपमधून एक लाख ६५ हजार ४३९ डॉलरची (एक कोटी नऊ लाख १८ हजार ९७४ रुपये) फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. तर अविनाश आणि हिम्मत राजपूत यांच्या ग्रुपने एक लाख ८९ हजार ७२० डॉलर अर्थात एक कोटी २५ लाख २१ हजार रुपये अमेरिकन नागरिकांकडून उकळले असून या सात जणांच्या चौकशीतून त्यांनी पाच कोटी ९१ लाख ५० हजार ७०४ रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.पहिले तीन मजले ‘रग्गड कमाई’चे1मीरा रोड येथील पेनकरपाडा हरी ओम आयटी पार्क, बाले हाउस, युनिवर्सल आउट सोर्सिंग सर्व्हिसेस आणि ओसवाल हाउस अशा तीन इमारतींमधील सात कॉल सेंटरवर पोलिसांनी धाडसत्र राबविले. त्यातील पेनकरपाडा हरी ओम आयटी पार्कच्या सातमजली इमारतीमध्ये कमाईप्रमाणे विभागणी केली होती. 2पहिल्या तीन मजल्यांवरील कथित कर्मचारी हे महिन्याला तीन ते पाच लाख डॉलर इतकी ‘कमाई’ कॉल सेंटरला करून देत होते. यामध्ये आयटी एक्सपर्टचा मोठा समावेश होता. तिकडून मिळालेले पैसे ते अहमदाबादला ट्रान्सफर करीत होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे पगारही मोठ्या वेगाने वाढत होते. तर चार ते सहा मजल्यांवरून एक ते तीन लाख प्रति महिना डॉलर ‘कमाई’ करणारा कर्मचारी वर्ग तैनात केलेला होता.3 शेवटच्या सातव्या मजल्यावर मात्र त्यांनी गिऱ्हाईकांना जाळ्यात कसे ओढायचे, अमेरिकन भाषेची लकब आणि कसब शिकविण्याचे प्रशिक्षण केंद्र उभारले होते. आता या टोळीने कोणाककडून आणि कसा स्वीकारला याची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.