आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २५ : राज्यातील खरेदी केंद्रांवर २२ एप्रिल पर्यत शेतकऱ्यांनी आणलेली सर्व तूर राज्य शासन खरेदी करणार असून यासाठी १ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे पैसे सात दिवसाच्या आत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. गेल्या १० वर्षात प्रथमच ५०५० रुपए हमी भाव देवून यावर्षी सर्वाधिक तूर खरेदी करण्यात आली आहे. राज्यातील विक्रमी तूर उत्पादन पाहून राज्य शासनाने तूर खरेदीची मुदत पहिल्यांदा १५ मार्चवरून १५ एप्रिल करण्याची केंद्र शासनाकडे विनंती केली. त्यानंतर तूर शिल्लक राहिल्याचे निर्दशनास आल्यानंतर ही मुदत पुन्हा २२ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली. यंदा राज्य शासनाने आतापर्यंत जवळपास ४ लाख टन तूर खरेदी केली असून ती जवळपास २५ पटीने अधिक आ शेतक?्यांच्या नावावर तुर विक्रीसाठी आणणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सुभाष देशमुख यांनी आज दिली.यंदा देशात एकूण ११ लाख टन तूर खरेदी झाली आहे. यापैकी राज्यात सुमारे ४० टक्के म्हणजेच ४ लाख टन आतापर्यंत तूर खरेदी करण्यात आली आहे. तर कर्नाटक राज्याने २ लाख टन, तेलंगणा १.६ लाख टन, गुजरात १.२५ लाख टन, मध्यप्रदेश ०.८५ लाख टन तूर खरेदी झाली आहे. राज्यात २०१२-१३ साली तुरीचे उत्पादन अधिक झाले होते. त्यावेळी २० हजार टन एवढी तूर खरेदी झाली होती.
खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत आलेली सर्व तूर राज्य शासन घेणार : पणनमंत्री सुभाष देशमुख यांचे स्पष्टीकरण
By admin | Published: April 25, 2017 6:11 PM