शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

२१९ कोटींचा हवाला व्यवहार उघड

By admin | Published: March 17, 2016 1:17 AM

महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहाराच्या करण्यात आलेल्या चौकशीत तब्बल २१९ कोटी रुपयांचा छगन भुजबळ यांनी हवाला व्यवहार केला व हे पैसे त्यांनी संपत्ती जमा करण्यासाठी लाच

- डिप्पी वांकाणी,  मुंबईमहाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहाराच्या करण्यात आलेल्या चौकशीत तब्बल २१९ कोटी रुपयांचा छगन भुजबळ यांनी हवाला व्यवहार केला व हे पैसे त्यांनी संपत्ती जमा करण्यासाठी लाच म्हणून घेतल्याचे उघड झाले आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी भुजबळांची त्यांच्या कंपन्यांच्या किमान तीन बनावट संचालकांसमोर बुधवारी चौकशी केली. हे कर्मचारी लाचेचा पैसा जमा करण्यासाठी स्थापन केलेल्या कंपन्यांचे संचालक बनविण्यात आलेले होते. सध्या छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे तुरुंगात आहेत. समीर भुजबळ यांना छगन भुजबळ यांच्या समोर गुरुवारी हजर करण्यासाठी त्यांचा ताबा मिळावा, असा अर्ज ईडीने न्यायालयाकडे केला आहे. छगन भुजबळ यांचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना असंबद्ध उत्तरे देऊन असहकार्य सुरूच आहे.‘या गैरव्यवहारामध्ये २१९ कोटी रुपयांचा (तोही बहुतेक रोख स्वरूपात) हवाला व्यवहार झाला. ही रोख रक्कम हवाला आॅपरेटर्सच्या माध्यमातून गेली, लाच म्हणून घेतलेले धनादेश (चेक्स) मुद्दाम स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये जमा करण्यात आले.’ असे विशेष तपास पथकाचा (एसआयटी) भाग असलेल्या सूत्रांनी सांगितले.ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या (एमईटी) तीन कर्मचाऱ्यांना भुजबळांसमोर आणण्यात आले होते. समीर आणि पंकज भुजबळ यांनी स्थापन केलेल्या बनावट कंपन्यांचे या कर्मचाऱ्यांना संचालक बनविण्यात आले होते. छगन भुजबळांसमोर एमईटीचा माजी कर्मचारी अमित बिराज याला उपस्थित करण्यात आले होते. हेक्स वर्ल्ड प्रोजेक्ट सुरू करण्यास खारघरमध्ये जागा विकत घेण्यासाठी देवीशा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पैसा वळविण्यात आला होता. याच देवीशाचा बिराज याला संचालक बनविण्यात आले होते. नवव्या मजल्यावर असलेल्या एमईटीच्या कार्यालयात भुजबळ यांनी एक हजार किमतीच्या नोटा स्वीकारल्या व त्यांची मोजणी करण्यासाठी यंत्र वापरावे लागले होते. या कार्यालयाच्या व्यवहारांचे खरे रूप बिराज याने या वेळी दाखविले. संजय जोशी आणि तनवीर शेख या अन्य कर्मचाऱ्यांनाही भुजबळ यांच्या समोर हजर करण्यात आले होते. जोशी आणि शेख यांनाही बनावट संचालक बनविण्यात आले होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांना एकमेकांसमोर उभे केले जाणार आहे. त्यासाठी त्याचा ताबा मिळावा असा अर्ज आम्ही न्यायालयाकडे केला आहे. याच कारणांवरून आम्ही समीर भुजबळची कोठडी वाढवून मागणार आहोत. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना समोरासमोर आणल्यानंतर विचारले जाणारे प्रश्न आम्ही तयार केले आहेत, असे सूत्र म्हणाले. छगन भुजबळांची ईडीची कोठडी गुरुवारी संपत असल्यामुळे त्यांना त्याच दिवशी न्यायालयात हजर केले जाईल.भुजबळ समाजसेवकपैशांचा स्रोत आणि नेमके व्यवहार याबद्दल विचारले असता आपली त्यात काही भूमिका नाही, असे भुजबळ म्हणाले. मी कसा समाजसेवक आहे, महोत्सवांमध्ये प्रसिद्ध लोक हजेरी लावत असलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे कसे आयोजन करतो, असे सांगून प्रकल्पांच्या भूमिपूजनाचे व्हिडीओ दाखविण्याची तयारी त्यांनी दाखविली. कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारांनी भुजबळांच्या फाउंडेशन ट्रस्टला पैसे दिले होते. या ट्रस्टचा तपशील पाठवायला सांगितल्यावर भुजबळांनी ध्वनिचित्रफीत पाठवून दिली होती. त्यामध्ये भुजबळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा तपशील होता व त्यात सेलिना जेटली, नेहा धुपिया, लारा दत्ता अशा कलावंतांनी कार्यक्रम सादर केल्याचे दिसले.जोखीम घ्यायची नव्हतीदीर्घावधीसाठी कोठडी न मागता ईडीने न्यायालयाकडे भुजबळ यांच्या चौकशीसाठी फक्त तीन दिवसांचीच कोठडी का मागितली, यावरून भुवया उंचावल्या जात आहेत. यावर खुलासा करताना सूत्रांनी सांगितले की, भुजबळ सोबत औषधांचे खोके घेऊन आले होते. तसेच त्यांचे उतारवय पाहता आम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नव्हती. त्यांच्या प्रकृतीचा विचार करूनच आम्ही दीर्घ कालावधीची कोठडी मागितली नाही.जेवण मागविलेछगन भुजबळ यांच्या निकवर्तीय सूूत्रांनी सांगितले की, ईडीकडून भुजबळ यांना चांगली वागणूक देण्यात येत आहे. ईडीची कॅन्टीन नसल्याने जवळच्या रेस्टॉरन्टमधून भुजबळ यांच्यासाठी जेवणही मागवण्यात आले.कर्मचाऱ्यांवरच आरोपभुजबळ यांच्या माजी कर्मचाऱ्यांना त्यांच्या समोर हजर केले असता या कर्मचाऱ्यांनी आम्हाला फक्त कागदोपत्री संचालक होण्यास सांगितल्याची कबुली दिली. तथापि, भुजबळ यांनी त्यांच्यावर असा दोषारोप केला की, कटकारस्थान रचून हे लोक माझ्यावर कुभांड रचत आहेत.