शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शोषणापासून शिक्षणापर्यंत : मुलांना हवी जागतिक मदत

By admin | Published: June 11, 2017 1:16 AM

१२ जून हा बालकामगारविरोधी दिन. १९९0च्या सुमारास संयुक्त राष्ट्रांनी असे जाहीर केले होते की २000 साल येईपर्यंत प्रत्येक मुलाला शिक्षण मिळेल. मात्र, प्रत्यक्षात असे

- कैलाश सत्यार्थी१२ जून हा बालकामगारविरोधी दिन. १९९0च्या सुमारास संयुक्त राष्ट्रांनी असे जाहीर केले होते की २000 साल येईपर्यंत प्रत्येक मुलाला शिक्षण मिळेल. मात्र, प्रत्यक्षात असे काही घडताना दिसले नाही. उलट, २0१६च्या जागतिक बालकामगार दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बालकामगारविरोधी अनेक कडक कायदे केल्यानंतरही जगभरात आजही सुमारे १६८ दशलक्ष मुलांचे निर्दयीपणे शोषण केले जात आहे. आजही, ६00 दशलक्षाहून अधिक लहान मुले दारिद्र्यात जगत आहेत. शिक्षण हा या दलदलीतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. पुढच्या पिढीच्या नशिबीही हा दुर्विलास येऊ नये, याची खातरजमा करणे, हे आपल्यापुढील एक नैतिक आव्हान आहे.२00२मध्ये १२ जून हा दरवर्षी बालकामगारविरोधी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे बालकामगार निर्मूलनात जागतिक समुदाय सातत्याने लक्ष घालेल आणि त्यासाठी सक्रिय राहील, याची खातरजमा झाली. जागतिक समुदायाने या मुद्द्यावर सातत्याने लक्ष द्यायला हवे, हे नक्कीच. १९९0च्या सुमारास संयुक्त राष्ट्रांनी असे जाहीर केले होते की २000 साल येईपर्यंत प्रत्येक मुलाला शिक्षण मिळेल. मात्र, प्रत्यक्षात असे काही घडताना दिसले नाही. उलट, २0१६च्या जागतिक बालकामगार दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बालकामगारविरोधी अनेक कडक कायदे केल्यानंतरही जगभरात आजही सुमारे १६८ दशलक्ष मुलांचे निर्दयीपणे शोषण केले जात आहे.गेल्या काही वर्षांत निर्वासित मुले आणि मुलांची तस्करी यात लक्षणीय वाढ झाल्याचेच या प्रत्यक्षातील गंभीर परिस्थितीवरून लक्षात येते. जगातील एकूण लोकसंख्येत लहान मुलांचा वाटा एक तृतीयांश आहे. मात्र, निर्वासितांमध्ये लहान मुलांचे प्रमाण ५0 टक्क्यांहून अधिक आहे. मागील १0 वर्षांत जवळपास १0 दशलक्ष मुले युद्ध आणि लढायांमध्ये मारली गेली तर ६0 लाखांहून अधिक अपंग झाली. अंदाजे २८ दशलक्ष निर्वासित मुलांना कोणतेही भवितव्य उरलेले नाही. सिरिया आणि अफगाणिस्तान या ठिकाणीच २0१५मध्ये मुलांच्या ५0 टक्क्यांहून अधिक निर्वासित होण्याच्या आणि इतर दुर्घटना घडल्यात. अगदी अचूक आणि विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नसली तरीही निर्वासित होण्याच्या या घटनांमध्ये लहान मुलांच्या तस्करीने फार मोठी मजल मारली आहे, हे नक्की.बालकामगार आणि मुलांच्या तस्करीच्या संदर्भात जागतिक समुदायाने पुन्हा एकदा, अत्यंत तातडीची निकड म्हणून या समस्येवर लक्ष द्यायला हवे आणि सक्रिय हालचाली करायला हव्यात. ही समस्या बहुविध पातळ्यांवर सोडवायला हवी. आध्यात्मिक गुरूंना यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी अधिक परिणामकारकरीत्या सहभागी करून घेणे आवश्यक आहे. कोणताही धर्म लहान मुलांच्या शोषणाला मान्यता देत नाही. उलट, सर्वच धर्मांमध्ये लहान मुलांचे रक्षण करणे हे पवित्र कार्य मानले जाते. धर्माप्रमाणेच सांस्कृतिक पातळीवरही या मुद्द्याचा विचार व्हायला हवा. जवळपास सर्व समाजगटांमध्ये, तथाकथित मागास म्हणवल्या जाणाऱ्या समाजापासून सर्वाधिक पुढारलेल्या समाजापर्यंत सगळीकडेच लहान मुलांना जपले जाते, त्यांचे बालपण साजरे केले जाते. अगदी स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत आपण या सांस्कृतिक वारशाला एका चिरकालीन मोहिमेत रूपांतरित करायला हवे.धर्म आणि संस्कृती यातून आपल्याला मुलांसाठी एक सुयोग्य जगाची निर्मिती करण्यासाठी नैतिक पाया मिळतो. तर, हे कार्य तडीस नेण्यासाठी अर्थव्यवस्थेतून आपल्याला साधने आणि स्रोत उपलब्ध होतील. रोजगाराच्या, उत्पन्नाच्या संधींचा अभाव हे बालकामगार निर्माण होण्याचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. नरेगा आणि मध्यान्ह भोजन यांसारख्या जनकल्याण मोहिमांमुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीच; त्याचबरोबर बालकामगारांच्या संख्येतही घट झाली. मात्र, ही आर्थिक लढाई दीर्घकालीन आणि खडतर असणार आहे. आजही, ६00 दशलक्षाहून अधिक लहान मुले पराकोटीच्या दारिद्र्यात जगत आहेत. शिक्षण हा या दलदलीतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. कोणताही सुसंस्कृत समाज बालकामगार पद्धतीचे समर्थन करणार नाही. कारण, अत्यंत परिणामकारक, सक्षमीकरण, समानता आणणाऱ्या आणि सबळीकरणाला चालना देणाऱ्या शिक्षण या साधनस्रोतातील, प्रक्रियेतील हा मोठा अडथळा ठरतो. शिवाय, २१0 दशलक्ष तरुण बेरोजगार असताना १६८ दशलक्ष मुलांना बालकामगारीच्या दलदलीत ढकलण्याचे आपण काय समर्थन करणार आहोत? पुढच्या पिढीच्या नशिबीही हा दुर्विलास येऊ नये, याची खातरजमा करणे, हे आपल्यापुढील एक नैतिक आव्हान आहे.बालकामगार पद्धतीच्या निर्मूलनाची मागणी करण्यासाठी ढाका, ओस्लो, साओ पावलो, पॅरिस, बँकॉक, केप टाऊन आणि काबुलमधील लाखोंचा समुदाय १९९८ साली ग्लोबल मार्च अगेंस्ट चाइल्ड लेबर या संचलनात सहभागी झाला होता. त्या वेळचा एक अत्यंत प्रभावी संदेश होता : शोषणापासून शिक्षणापर्यंत. पुन्हा एकदा जागतिक पातळीवर एक मोठा प्रयत्न करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.(लेखक २0१४मधील शांततेसाठीचे नोबेल पुरस्कार विजेते आहेत. त्यांनी कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे.)

शब्दांकन - चेतन ननावरे