शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नागपूरमधील सदर पोलीस ठाण्यात स्फोट

By admin | Published: May 26, 2017 8:13 PM

सदर पोलीस ठाण्यात आज दुपारी २.१६ वाजता स्फोट झाल्याने उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त उपराजधानीत

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 26 - सदर पोलीस ठाण्यात आज दुपारी २.१६ वाजता स्फोट झाल्याने उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त उपराजधानीत देशभरातील महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची मांदियाळी जमणार असताना ही घटना घडल्याने पोलीस प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली होती. मात्र, हा स्फोट घडवून आणलेल्या आरोपीने स्वत:चे नाव चिठ्ठीत लिहून ठेवल्याने अवघ्या दोन तासांतच पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर कुटुंबं कलहामुळे तो मानसिक रुग्ण झाल्याचे आणि या अवस्थेतूनच त्याने हा स्फोट घडवून आणल्याचे स्पष्ट झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला विराम मिळाला. 
शहरातील अतिमहत्त्वाचा परिसर म्हणून ओळख असलेल्या सिव्हिल लाईन्समध्ये मेट्रो रेल्वेचे मुख्य कार्यालय, विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय आहे. येथून  हाकेच्या अंतरावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, न्यायालय, उद्योग भवन, प्रशासकीय भवन, गुन्हे शाखा आणि अन्य अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत. अशा या महत्त्वाच्या कार्यालयाजवळ सदर पोलीस ठाणे आहे. स्मार्ट पोलीस ठाण्याच्या संकल्पनेनुसार सदर ठाण्यात विविध प्रकारची कामे सुरू आहेत. येथे काम करणारे मुकेश निंबर्ते, अविनाश चौधरी आणि प्रतीक भेदे नामक मजूर पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागातील (उजवीकडे) हिरवळीवर शुक्रवारी दुपारी २.१५ वाजता जेवण करायला बसले. त्यांनी आपले टिफीन उघडले असतानाच अचानक २.१६ वाजता जोरदार स्फोट झाला. त्यामुळे हादरलेल्या या तिघांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, स्फोटाचा जोरदार आवाज ऐकून पोलीस ठाण्यातील मंडळी धावतच बाहेर आली. ज्या ठिकाणी स्फोट झाला. त्या ठिकाणी छोटा खड्डा पडला. बाकड्याचा काही भाग तुटला आणि कंपाऊंड वॉलच्या पिलरला खड्डा पडला. बाजूची झाडेही काळपट पडली. पोलीस ठाण्याच्या आवारात स्फोट झाल्याच्या वृत्ताने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. ठाणेदार सुनील बोंडे यांनी या प्रकाराची माहिती कळविताच बॉम्बशोधक व नाशक पथक श्वानासह घटनास्थळी पोहचले. त्यांच्या पाठोपाठ दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस आयुक्त महेश सवई, सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे आपापल्या ताफ्यासह सदर ठाण्यात पोहचले. पाठोपाठ गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, अतिरिक्त आयुक्त श्यामराव दिघावकर, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनीही धाव घेतली. 
स्फोट कसा झाला, का झाला, कुणी केला, त्याची चौकशी सुरू झाली. स्फोट ज्या ठिकाणी घडला, त्या ठिकाणाहून सुमारे ८ ते १० फूट अंतरावर पोलिसांना दोन चिठ्ठ्या आढळल्या. तीत स्फोट घडवून आणणारा आरोपी मुकेश अंभोरे याने स्वत:चे नावही लिहिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या प्रतापनगरातील घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 
 
यापूर्वी बार रूममध्ये केला होता स्फोट...
आरोपीने बिसलरीच्या बाटलीत सुतळी बॉम्बमध्ये वापरली जाणारी बारूद भरून नोझलच्या आधारे पॅकिंग करून एक प्रकारे पाईप बॉम्ब तयार केला. त्याआधारे सदर ठाण्यात हा स्फोट घडवून आणला. आरोपी मुकेश अंभोरे याने २०१० मध्ये जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या वकिलांच्या कक्षात (बार रूम) टायमरच्या साह्याने स्फोट घडवून आणला होता. त्याला पकडून पोलिसांनी सदर ठाण्यात आणताच मुकेश अनियंत्रित झाला. तो पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला. बळाचा वापर करीत त्याला पोलिसांनी कसेबसे नियंत्रित केले.
 
काय लिहून आहे चिठ्ठीत ? 
आरोपी मुकेशने लिहिलेल्या दोन्ही चिठ्ठीत काहीसा विचित्र मजकूर आहे. पहिल्या चिठ्ठीत त्याने 
‘‘ भारत सरकार के महिला कानून मे खामिया होने के कारण सोती हुयी पुलिस को जगाने के लिए बम विस्फोट करने के लिए मजबूर हूंवा हूं मामला २० दिसंबर २००७ को  कोर्ट मे जहर पिने वाले का है’’, असे लिहिले असून, 
दुसºया चिठ्ठीत त्याने राज्यातील आश्रम शाळांमधील गैरप्रकाराकडे लक्षवेध केला आहे. आदिवासी विकास महामंडळ तसेच उमरेडमधील आश्रम शाळेतील दोषींना वाचविण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही त्याने लावला आहे. पोलीस अन्यायग्रस्तांकडे लक्ष देत नाही, त्यामुळेच माणूस गुन्हेगार बनतो, असेही त्याने म्हटले आहे. या स्फोटातून पोलिसांना जागृत (अवेर) करायचे आहे, अशी मखलाशीही त्याने या चिठ्ठीतून केली आहे. या चिठ्ठ्या पोलिसांनी जप्त केल्या. 
 
स्फोटाची चौकशी सुरू...
स्फोटाच्या घटनाक्रमाची माहिती देताना सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी पत्रकारांना सांगितले की, आरोपी कुटुंब कलहामुळे त्रस्त झाला आहे. त्यातून तो मनोरुग्णासारखा वागतो. नेहमी इकडेतिकडे फिरत राहतो. त्याने हे कृत्य केल्याचे जवळपास स्पष्ट झाले असले तरी आम्ही चौकशीचे सर्व पर्याय तपासत असल्याचेही ते म्हणाले. या स्फोटाची चौकशी सुरू असून, काळजीचे कुठलेही कारण नसल्याचे ते म्हणाले.