डोंबिवली- डोंबिवलीजवळच्या खोणी गावात स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. ठाणे क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने ही कारवाई केलीये.खोणी गाव परिसरात दोन इसम स्फोटकांचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानुसार रविवारी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील बॅगमध्ये स्फोटकांचा मोठा साठा आढळून आला. ज्यात तब्बल १९९ जिलेटीनच्या कांड्या, १०० डिटोनेटर्सचा आणि 2 कट्टे समावेश होता. ही स्फोटके बाळगण्याचा कुठलाही परवाना त्यांच्याकडे नसल्याने हा साठा जप्त करत पोलिसांनी या दोघांना अटक केली. अशोक ताम्हणे आणि मारुती धुळे अशी या दोघांची नावे असून ते रायगड जिल्ह्यातल्या कर्जतचे राहणारे आहेत. हा साठा त्यांनी नेमका कशासाठी आणला होता? आणि या दोघांचा दहशतवादी किंवा नक्षलवादी कारवायांशी संबंध आहे का? याचा तपास सध्या क्राईम ब्रँचच्या वतीने सुरू आहे. सदर कामगिरी वपोनी संजू जॉन, सपोनि संतोष शेवाळे, नितीनं मुदगून, दत्ताराम भोसले आणि टीम यांनी यांनी केली.
डोंबिवलीजवळ स्फोटकांचा मोठा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 6:46 PM