- विश्वास पाटील, कोल्हापूरसाखर निर्यात न करणाऱ्या कारखान्यांवर खरेदी कर रद्द करण्याची कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असला तरी राज्यातील बड्या कारखानदारांनी साखर निर्यातीकडे पाठ फिरविल्याचे ‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी स्वत: पुढाकार घेत कारखानदारांना साखर निर्यातीची सूचना केली. मात्र साखर निर्यात न करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महत्त्वाच्या नेत्यांच्या ताब्यातील कारखान्यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेत्यांच्या ताब्यातील कारखान्यांनी निर्यातीकडे पाठ फिरविली आहे. साखर उद्योगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्यातीसाठी थेट पंतप्रधानांकडे आग्रह धरला होता व त्यानंतर केंद्र शासनाने निर्यातीचे धोरण जाहीर केले होते. आता त्यानुसार निर्यातीची वेळ आल्यावर मात्र पुढच्या हंगामात साखरेला चांगला दर मिळेल म्हणून बड्या नेत्यांचे खासगी कारखाने निर्यातच करायला तयार नाही. त्यामुळे सहकारी कारखानदारांनीही त्याचीच री ओढली आहे. ‘लोकमत’ने बुधवारपर्यंत निर्यात न केलेल्या कारखान्यांची माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळविली. साखर निर्यात न केलेल्या नेत्यांचे कारखाने- माजी मंत्री अजित पवार (अंबालिका, अहमदनगर)-माजी मंत्री जयंत पाटील (राजारामबापूसह अन्य तीन युनिट, साखराळे)-विजयसिंह मोहिते-पाटील (सहकारमहर्षीसह अन्य तीन युनिट, सोलापूर)-खा. धनंजय महाडिक (भीमा, टाकळी, सोलापूर)-बबनराव शिंदे (विठ्ठल कॉर्पोरेशन, सोलापूर)-माजी मंत्री छगन भुजबळ (गिरणा आर्मस्ट्राँग, नाशिक)-माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (भाऊराव पाटीलसह तीन युनिट, नांदेड)-आ. अमित व दिलीप देशमुख (मांजरा व रेणासह चार युनिट, लातूर)-माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (इंदापूरसह तीन युनिट, पुणे)-माजी मंत्री पतंगराव कदम (सोनहिरा)-कल्याणराव काळे (चंद्रभागा, सोलापूर)-आ. सुभाष देशमुख (लोकमंगल अॅग्रो सोलापूर)-शंभूराजे देसाई (लोकनेते बाळासाहेब देसाई, पाटण)मराठवाड्यातील स्थिती : मराठवाड्यातील नांदेड, औरंगाबाद विभागात सुमारे पन्नास कारखाने आहेत. परंतु कमी उत्पादनाचे कारण देत १० कारखान्यांनी निर्यात केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील सोळापैकी एकट्या बी. बी. ठोंबरे यांच्या ‘नॅचरल शुगर्स’ व लातूरमध्ये १२ पैकी एकमेव सिद्धी शुगर कारखान्यानेच निर्यात केली आहे. औरंगाबादमधील एकाच खासगी कारखान्याने निर्यात केली आहे.दृष्टिक्षेपात निर्यात कोटा(लाख टन)देशाचा या वर्षीचा कोटा : ४० अपेक्षित निर्यात (८० टक्के) : ३२ महाराष्ट्राचा कोटा : १२ राज्यातून झालेली निर्यात : ३ देशातून झालेली निर्यात : ९ विभागनिहाय कोटा व निर्यात(लाख क्विंटल)पुणे ५२.८८ : ११.७०कोल्हापूर ४५ : १०.६०अहमदनगर१९.५०:२.१८नांदेड ६.८९ : ००.३३औरंगाबाद ९.२ : १.७२अमरावती ००.६५: ००नागपूर००.८९ :००एकूण१३९.६०:२५.६३
साखर निर्यातीकडे पाठ !
By admin | Published: February 27, 2016 2:10 AM