लोणावळा/खोपोली : आॅईलचा टँकर पलटी झाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग शनिवारी ठप्प झाला. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खंडाळा एक्झिटजवळ ही दुर्घटना घडली. टँकरमधील आॅईल द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात पसरल्याने सुमारे सहा तास वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. यामुळेदुतर्फा जवळपास दहा किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दु्रतगतीवरील वाहतूक दुपारी साडेतीनच्या आणि मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दुपारी दोनच्या सुमारास पूर्णपणे सुरळीत झाली. मुंबईच्या दिशेने कच्चे तेल घेऊन निघालेल्या टँकर (एमएच ०४ जीसी ४१३५) चालकाचे खंडाळा एक्झिट येथील वळण-उतारावर नियंत्रण सुटले. त्यामुळे टॅँकर उलटून टाकी फुटल्याने आॅइल द्रुतगती महामार्गावर पसरले. त्यावरुन जाणारी वाहने घसरू लागल्याने वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई व पुणे दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पूर्णपणे थांबवून ती राष्ट्रीय महामार्ग क्र. ४वर वळविण्यात आली. यामुळे लोणावळा व खोपोलीत कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली. दुपारपर्यंत संथ गतीनेदेखील वाहतूक पुढे सरकत नव्हती. यामुळे स्थानिक नागरिकांना यामुळे घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. वाहनचालक व प्रवाशांना तासन्तास अन्न-पाण्यावाचून अडकून पडावे लागले. वीकएंडमुळे पर्यटनासाठी सकाळीच मोठ्या संख्येने पर्यटक घराबाहेर पडल्याने आज वाहनांची संख्या तुलनेने जास्त होती. साडेनऊ तासांनंतर वाहतूक सुरळीतखंडाळा महामार्गाचे सहायक निरीक्षक मोहन चाळके व पथक, तसेच आयआरबी कंपनीचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तातडीने आॅइल पसरलेल्या परिसरात माती व डस्ट टाकण्याचे काम सुरू केले. पण, महामार्गाच्या तीव्र उतारामुळे जवळपास अर्धा किमी परिसरात आॅइल पसरल्याने यंत्रणांची तारांबळ उडाली. वाहने घसरत असल्याने वाहतूक सुरु करण्यात अडचणी येत होत्या. अकरा वाजता पुण्याकडे येणाऱ्या तिन्ही लेन व मुंबईकडची एक लेन सुरू करण्यात आली. एक वाजता टॅँकर हटविण्यात आला. त्यानंतर तब्बल साडेनऊ तासानंतर दु्रतगती महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली.
एक्स्प्रेस- वे ९ तास ठप्प
By admin | Published: February 21, 2016 1:25 AM